शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

दिएगो मॅरेडोना यांचे निधन, फुटबॉलच्या एका युगाची अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:37 IST

वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतला अखेरचा श्वास

ब्युनास आयर्स: अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी बुधवारी  हृदयविकाराच्या झटक्यामुळे  निधन झाले.  १९८६ साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचे नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झाले. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही झाली. यातून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना ११ नोव्हेंबर रोजी   त्यांच्या घरी हलविण्यात आले होते. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅरेडोना यांच्या निधनामुळे  क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मॅरेडोना यांनी वयाच्या १६ व्या वर्षी फुटबॉल करिअरची सुरुवात अर्जेंटिनाच्या ज्युनियर संघाद्वारे केली. लवकरच ते फुटबॉलमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये सहभागी झाले. १९८६ चा फिफा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या खेळाडूची कारकीर्द जितकी शानदार तितकीच वादग्रस्त देखील ठरली. मॅरेडोनाने बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बासिर्लोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. इंग्लंडविरुद्ध १९८६ साली झालेल्या स्पर्धेतील गोल फुटबॉलविश्व कधीही विसरू शकणार नाही. याच गोलला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ असे संबोधले जाते. अनेक वर्षानंतर त्यांनी हेतूपुरस्सरपणे चेंडूला हात लावल्याची कबुली देखील दिली होती. त्याच सामन्यात त्यांनी चार मिनिटानंतर सुरेख गोल नोंदविला होता. फिफाने या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल संबोधले होते. 

फुटबॉलच्या एका युगाची अखेर...पेलेसोबतच जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये गणना झालेले मॅरेडोना अवघ्या ६० वर्षांचे होते.  चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या खेळाडूने  व्यावसायिक खेळातून निवृत्त झाल्यानंतरही योगदान म्हणून राष्ट्रीय संघाचे कोच आणि व्यवस्थापकपद सांभाळले होते. अनेक  वर्षांपासून त्यांना कोकेन या अमली पदार्थाची सवय जडली होती. यामुळे शरीराचा लठ्ठपणा देखील वाढला होता. त्यांच्या निधनामुळे जगभरात शोक पसरला असून अर्जेंटिनाने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. सोशल मीडियावर या महान खेळाडूच्या अविस्मरणीय आठवणींचा अक्षरश: पाऊस पडत आहे.  

मॅरेडोनाची कृती कॅमेऱ्यात कैद

२२ जून १९८६ साली मेक्सिकोच्या अझटेका स्टेडीयमवर झालेल्या अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना मध्यांतरापर्यंत ०-० असा बरोबरीत सुरु होता. मध्यांतरानंतर मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाकडून पहिला गोल झळकावला. परंतू हा गोल करत असताना मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला होता. फुटबॉलच्या नियमानुसार मैदानातील पंचांनी यावेळी मॅरेडोना यांना येलो कार्ड दाखवून गोल नाकारणं गरजेचे होते. मात्र मॅरेडोना यांचा हात बॉलला लागला हे पंचांच्या दृष्टीपथात नव्हते आणि  व्हिडीओ रेफरल सिस्टीम उपलब्ध नसल्यामुळे मॅरेडोना यांचा हा गोल वैध ठरवण्यात आला. या गोलच्या आधारे अर्जेंटिनाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली.

सामना संपल्यानंतर अर्जेंटिनाने २-१ ने बाजी मारत विजेतेपदावर मोहर उमटवली होती. मॅरेडोना यांनी झळकावलेला दुसरा गोल हा फुटबॉलविश्वात ‘गोल ऑफ द सेंच्यूरी’ म्हणून ओळखला जातो. अंतिम सामना संपल्यानंतर पत्रकारांनी मॅरेडोना यांना पहिल्या गोलविषयी विचारले असता मॅरेडोना यांनी त्या गोलचे वर्णन केले.   सामन्यात रेफ्री म्हणून काम पाहणारे ट्युनिशीयाचे अली बेनासूर यांनी मॅरेडोना यांचा पहिला गोल वैध ठरवल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी याविरोधात नाराजी व्यक्त करत लाईन्समनच मत घ्यायला सांगितलं. परंतू दुर्दैवाने लाईन्समननेही मॅरेडोना यांच्या पारड्यात मत टाकले. मेक्सिकोचे फोटोग्राफर अलेजांड्रो ओजेडा यांच्या कॅमेऱ्यात मात्र मॅरेडोना यांची ही कृती कैद झाली होती.

 

टॅग्स :FootballफुटबॉलDeathमृत्यू