मुंबई : युवा जलतरणपटू वीरधवल खाडे सध्या पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी कसून सराव करीत आहे. गोल्डकोस्ट येथे होणाºया स्पर्धेत स्वत:ला पारखता येईल आणि या स्पर्धेद्वारे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्वत:च्या तयारीचा अंदाज येईल, असे त्याने सांगितले.खाडे म्हणाला, मी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ५0 मीटर फ्रीस्टाईल आणि बटरफ्लाय प्रकारात सहभागी होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून चांगले ट्रेनिंग सुरू आहे आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याकडे माझे लक्ष आहे. राष्ट्रकुल स्पर्धा ही स्वत:ला पारखण्यासाठी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चांगले व्यासपीठ ठरेल.’जकार्ता येथे पदक जिंकण्याविषयी मी खूप सकारात्मक आहे. ट्रेनिंग चांगली सुरू आहे आणि यात काही मायक्रो-सेकंदाचा फरक असतो. मी आगामी महिन्यात पदक जिंकेल, असा मला विश्वास वाटतो.- वीरधवल खाडे
राष्ट्रकुल स्पर्धेत स्वत:ला पारखणार - वीरधवल खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:35 IST