विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅमचा पाठलाग करणारा नोव्हाक जोकोविच पुन्हा एकदा ग्रँड स्लॅमच्या सेमी फायनलमध्ये अडखळला. २२ वर्षीय स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराझ याने आर्थर अॅश स्टेडियमवर रंगलेल्या लढतीत ३८ वर्षीय जोकोला ६-४, ७-६, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोको यंदाच्या प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेची सेमीफायल खेळला, पण दोघांपैकी एक आडवा आला
या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतही नोव्हाक जोकोविच याने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. पण त्यावेळी यानिक सिनर याने त्याला पराभूत केले होते. फ्रेंच ओपन स्पर्धेत अल्काराझनं सेमीत त्याला पराभूत केले. विम्बल्डनमध्ये पुन्हा सिनर आणि आता अमेरिकन ओपनमध्ये पुन्हा अल्काराझ पुन्हा एकदा दिग्गज टेनिस स्टारवर भारी पडला. परिणामी चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेत सेमीत मजल मारल्यावरही २०२५ या कॅलेंडर ईयरमध्ये विक्रमी २५ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचं जोकोविचच स्वप्न अधूरेच राहिले. आणखी एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत आता अल्काराझ विरुद्ध सिनर यांच्यात फायनल सामना रंगणार आहे.
तुम्हाला माहितीये का? टेनिस कोर्टवरील या सुंदरीला 'द टायगर' नावानं ओळखलं जातं; कारण...
दोघांसमोर निभाव लागेना! त्यावर काय म्हणाला जोकोविच?
नोव्हाक जोकोविच याने यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ हे सर्वोत्तम खेळत आहेत, असे म्हटले आहे. ग्रँडस्लॅमच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्यासमोर खेळणं कठीण जातं आहे, ही गोष्टही जोकोनं मान्य केली. या टप्प्यावर शरीराची मर्यादा जाणवते. वयाच्या ३८ व्या वर्षी या युवा खेळाडूंचा सामना करणं अधिक आव्हानात्मक झाले आहे, असे सांगताना २५ व्या ग्रँडस्लॅमचा पाठलाग थांबणार नाही, असे म्हणत अनुभवी टेनिस स्टारनं पुन्हा नव्या जोमानं कोर्टवर उतरणार याचे संकेत दिले आहेत.
नोव्हाक जोकोविचची २०२५ ग्रँडस्लॅम स्पर्धेतील कामगिरी
- ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ सेमीफायनलमध्ये पराभव विरुद्ध यानिक सिनर (१–६, २–६, ७–६, ३–६
- फ्रेंच ओपन २०२५ सेमीफायनलमध्ये पराभव विरुद्ध कार्लोस अल्काराझ (३–६,६–७, ६–३, २–६
- विंबल्डन २०२५ सेमीफायनलमध्ये पराभव विरुद्ध यानिक सिनर (४–६, ७–६, ४–६,२–६)
- यूएस ओपन २०२५ सेमीफायनलमध्ये पराभव विरुद्ध कार्लोस अल्काराझ (४–६, ६–७ (४-७), २–६)