शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

अपूर्वीला रौप्य

By admin | Updated: September 6, 2015 00:08 IST

युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेलाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करताना आज येथे आयएसएसएफ रायफल आणि पिस्टल वर्ल्डकप फायनल्स महिलांच्या १0 मीटर एअर

म्युनीच : युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंदेलाने पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी करताना आज येथे आयएसएसएफ रायफल आणि पिस्टल वर्ल्डकप फायनल्स महिलांच्या १0 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकले.जयपूरच्या २२ वर्षीय अपूर्वीने २0६.९ गुणांसह रौप्यपदक मिळविले. ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या इराणच्या अहमादी इलाहेल हिच्यापेक्षा फक्त 0.६ गुणाने मागे राहिली. अहमादी इलाहेलने २0७.५ गुण मिळविले. सर्बियाच्या आंद्रिया अर्सोविचने शूट आॅफमध्ये क्रोएशियाच्या वेलेनटिना गस्टिन हिला मागे टाकत कांस्यपदक जिंकले. फायनलमध्ये अपूर्वीने सुरुवातीलाच १0.८ गुण घेत आघाडी घेतली. मात्र, नंतर ती एकूण ३0.६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरली. त्यानंतर अपूर्वी पदकांच्या शर्यतीत कायम राहिली. अपूर्वीने अखेरच्या फेरीत १0.२ गुण मिळवले आणि अखेर ती सुवर्णपदक जिंकणाऱ्या अहमादीपासून फक्त 0.२ गुणाने पिछाडीवर होती. तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने १0.४ गुण मिळविले.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अपूर्वीने एप्रिलमध्ये कोरियात चांगवोन येथे कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे ती पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी आधीच पात्र ठरली होती. लंडन आॅलिम्पिकचा कांस्यपदक विजेता गगन नारंग आणि गुरप्रीतसिंह आपापल्या गटाच्या फायनलमध्ये पोहोचले; परंतु पदक जिंकण्यात त्यांना अपयश आले. (वृत्तसंस्था)