शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणार अंडर-१७ फिफा विश्वचषक

By admin | Updated: May 30, 2015 01:52 IST

भारतात होणारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात होणार असून, यातील सहापैकी चार ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. स्पर्धा संयोजन समितीने ही माहिती दिली.

मुंबई : भारतात होणारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात होणार असून, यातील सहापैकी चार ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. स्पर्धा संयोजन समितीने ही माहिती दिली.स्पर्धा संयोजक जेव्हियर सेपी पत्रकार परिषदेत म्हणाले, या चार ठिकाणांत मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम, गुवाहाटी, कोलकाता आणि कोची यांचा समावेश आहे. आणखी तीन ठिकाणांची निवड होणार असून, गोवा, चेन्नई, दिल्ली, बंगलोर किंवा पुणे यातून निवड होणार आहे. त्याचबरोबर इंडियन सुपर लीग स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचेही सेपी यांनी यावेळी स्पष्ट केले.सेपी म्हणाले, १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी मे अखेरीस संपणार आहे. मुख्य स्पर्धेपूर्वी किमान तीन महिने ही फेरी संपणे आवश्यक आहे. त्यामुळे ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यापूर्वी होणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या स्पर्धेत भारतासह आशियातील अन्य चार संघ मैदानात उतरतील. त्याचबरोबर युरोपमधील सहा, उत्तर अमेरिका आणि कॅरेबियामधील चार, दक्षिण अमेरिकेतील चार, आफ्रिकेतील चार व ओशियानाचा एक संघ सहभागी होणार आहे. सेपी म्हणाले, ‘एआयएफएफशी केलेल्या विचारविनिमयानंतरच स्पर्धेचा कालावधी ठरवण्यात आला आहे. आम्हाला माहीत आहे की, आयएसएल व आय लीग स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. मात्र, भारतात ८७ वर्षांनंतर १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा होत आहे.’