शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निशांत देववर पंचांनी केला अन्याय; वादग्रस्त गुणांकनाने हिरावले पदक? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 08:21 IST

निशांत ७१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असतानाही मेक्सिकोच्या मार्को वर्दे याच्याकडून १-४ असा पराभूत झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

नवी दिल्ली : बॉक्सिंगमध्ये विजेत्याचा निर्णय एकमेकांना लगावलेल्या ठोश्यांवर ठरतो, पण बॉक्सिंगमधील गुणांकन प्रणाली आजपर्यंत कोणीही समजू शकलेला नाही. याचे उदाहरण म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या निशांत देवचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना.

निशांत ७१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत दोन फेऱ्यांमध्ये आघाडीवर असतानाही मेक्सिकोच्या मार्को वर्दे याच्याकडून १-४ असा पराभूत झाला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पंच कशाच्या आधारे निकाल देतात यावरून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये वाद होतो. लॉस एंजिलेस येथे २०२८ ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश अनिश्चित आहे. गुणांकनामुळे बॉक्सिंगसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. टोकयो ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम उपांत्यपूर्व लढतीत अशाच प्रकारे वादग्रस्त गुणांकनाचा फटका बसला होता.

पंचांनी गमावली विश्वासार्हताअमॅच्युअर बॉक्सिंगची गुणांकन पद्धती बदलल्यामुळे पंचांनी विश्वासार्हता गमावली. सियोल ऑलिम्पिक १९८८, रोम ऑलिम्पिक १९६० मध्ये अनेक अधिकाऱ्यांना वादग्रस्त निर्णयासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बाहेर केले. सियोल ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या रॉय जोन्स ज्युनियरला ८६ ठोशांचा वर्षाव करूनही पराभूत व्हावे लागले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४boxingबॉक्सिंग