शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ट्रिपल महाराष्ट्र केसरी अन् पुणे SP विजय चौधरी विश्व विजेते; भारताल 'गोल्ड'

By विवेक भुसे | Updated: July 30, 2023 12:08 IST

वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये कुस्तीत भारताला सुवर्णपदक

विवेक भुसे

पुणे : कुस्तीमधील महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू, तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेते आणि अपर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथील वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. कॅनडामधील विणीपेग येथे वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स ही जागतिक स्तरावरील पोलिस दलाची स्पर्धा सुरु आहे. पोलिस दलासाठी ते  ऑलिंपिक मानले जाते. विजय चौधरी यांचा उपांत्य फेरीत गतविजेत्या जेसी साहोटाशी यांचा सामना होता. अटीतटीच्या लढतीत चौधरी यांनी साहोताचा ११-०८ अशा मात केली. अंतिम सामन्यात विजय चौधरी  यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर १० गुणांची आघाडी घेत ११-०१ असा एकतर्फी विजय मिळवत भारताला १२५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे. चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते.

आपल्या विजयाबद्दल बोलताना चौधरी म्हणाले, ‘‘काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की मला जागतिक पोलीस खेळांमध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे.’’महाराष्ट्र राज्य पोलीस विभागातील माझे वरिष्ठ पोलीस अधिकारी, परिवार, गुरु, गाव, मित्रमंडळी च्या सततच्या पाठिंब्यामुळेच हा विजय शक्य झाला, असे चौधरी यांनी नमूद केले. चौधरी पुढे म्हणाले की, ‘‘मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकार्‍याला व अंमलदारांना समर्पित करतो. जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची २४ तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करतो.’’

टॅग्स :PoliceपोलिसWrestlingकुस्तीPuneपुणे