शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सजेंडर महिला बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यास बंदी; फिडेचा निर्णय, वाद उद्भवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 09:04 IST

सहभागास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे फिडेने सांगितले.

जिनेव्हा: जागतिक बुद्धिबळातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘फिडे’ने लिंग परिवर्तन करीत पुरुषांपासून महिला बनलेल्या बुद्धिबळपटूंवर स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली आहे. आमचे अधिकारी लिंग परिवर्तनाची समीक्षा करेपर्यंत ट्रान्सजेंडर महिलांना स्पर्धेत मज्जाव असेल, असे ‘फिडे’ने शुक्रवारी स्पष्ट केले. 

‘फिडे’च्या या निर्णयावर ट्रान्सजेंडरच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या पाठीराख्यांनी कठोर शब्दांत टीका केली. दुसरीकडे, फिडेचे सदस्य असलेल्या महासंघांकडून ट्रान्सजेंडरला स्पर्धेत खेळू देण्याची विनंती केली जात आहे. या महिलांच्या सहभागास परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे फिडेने सांगितले.

‘लिंग परिवर्तनामुळे खेळाडूची स्थिती आणि स्पर्धेत सहभागी होण्याच्या पात्रतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे लिंग परिवर्तनाचे प्रासंगिक आणि ठोस कारण उपलब्ध असेल तरच अशा खेळाडूंना परवानगी देणे शक्य होऊ शकेल. कुणीही स्वमर्जीने लिंग परिवर्तन करीत पुरुषापासून महिला बनले असेल तर फिडेच्या पुढील निर्णयापर्यंत अशा महिला खेळाडूला बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी होता येणार नाही,’ असे फिडने म्हटले आहे.

पुरुषांसाठी नियम

फिङेने म्हटले की, एखादी महिला खेळाडू लिंग परिवर्तन करीत पुरुष बनला असेल तर त्या महिलेचे आधीचे सर्व पुरस्कार आणि रेटिंग काढून घेतले जातील. याउलट एखादा पुरुष लिंग परिवर्तनाद्वारे महिला बनली असेल तर त्या पुरुष खेळाडूचे आधीचे पुरस्कार आणि रेटिंग कायम ठेवले जातील.  

 

टॅग्स :Chessबुद्धीबळ