शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Paralympics Avani Lekhara: लय भारी! ऐतिहासिक 'सुवर्ण'वेध घेणाऱ्या नेमबाज अवनी लेखराची 'कांस्य'कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 11:39 AM

Paralympics Avani Lekhara: याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळली होती.

Tokyo Paralympics 2020 : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारताचा धमाका सुरुच आहे. अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. (Tokyo Paralympics, R8 Women's 50m Rifle 3P SH1: Avani Lekhara wins bronze medal)

याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती.  10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळाले  होते. दरम्यान, अवनी लेखराने क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवे स्थान पटकावले होते. 

ऑलिम्पिक असो वा पॅरालिम्पिक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. तत्पूर्वी पी.व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटात रौप्यपदके जिंकली होती. तसेच पॅरालिम्पिकध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे.

या स्पर्धेत मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर देवेंद्र झाझरियाने भारतासाठी दुसरे आणि तिसरे पदक जिंकले. तर चौथे पदक मरियप्पन थंगावेलू याने जिंकले होते.

प्रवीणकुमारने जिंकले रौप्यपदकभारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली होती. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले. 

 

टॅग्स :Shootingगोळीबार