शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

Tokyo Paralympics 2020 : जबरदस्त, शानदार; भारताच्या प्रमोद भगतनं जिंकलं ऐतिहासिक गोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2021 4:13 PM

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या प्रमोद भगतनं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या प्रमोद भगतनं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत त्यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर 21-14 21-17 असा विजय मिळवला. भारताचे हे बॅडमिंटनमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यापाठोपाठ मनोज सरकारनं कांस्यपदकाची लढत जिंकून भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केलं. भारतानं यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत चार सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १७ पदकांची कमाई केली. दुसरीकडे कृष्णा नागर यानं भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू कृष्णानं पुरुष एकेरी SH6 गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टीन कूम्ब्सचा २१-१०, २१-११ असा सहज पराभव केला.   पहिल्या गेममध्ये प्रमोदनं ३-६ अशा पिछाडीवरून ८-६ अशी आघाडी घेतली. ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूला प्रमोदनं चांगलंच दमवलं. त्यानं ही आघाडी ११-८ अशी भक्कम केली. ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूनं कमबॅक करताना ही पिछाडी कमी केली, परंतु प्रमोदनं त्याला डोईजड होऊ दिले नाही. त्यानं पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये डॅनिएलनं ११-४ अशी मोठी आघाडी घेत कमबॅक केले. प्रमोदनं पुढील ९ गुणांपैकी ७ गुण घेत हा गेम ११-१३ असा अटीतटीचा बनवला. प्रमोदनं त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही आणि हा गेम २१-१७ असा जिंकून सुवर्णपदक निश्चित केलं. 

वर्ल्ड नंबर वन प्रमोद भगत यानं सेमिफायनलमध्ये जपानच्या स्पर्धकाला मात देत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या फुजीहारा याच्यावर २१-११, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये विजय प्राप्त केला. सेमीफायनलमध्ये भारताच्या मनोज सरकार याला ग्रेट ब्रिटनच्या स्पर्धकाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. मनोजनं कांस्यपदकाच्या सामन्यात बाजी मारली

कोण आहे प्रमोद भगत?बिहार येथील वैशाली गावातला त्याचा जन्म. पाच वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाची वाढ खुंटली. १३ वर्षांचा असताना तो एकदा बॅडमिंटन सामना पाहायला गेला अन् त्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो ओडिसा येथे स्थायिक झाला. पुढील दोन वर्ष त्यानं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. १५ वर्षांचा असताना त्यानं पहिली स्पर्धा खेळली आणि प्रेक्षकांचा पाठींबा पाहून त्याला आणखी प्रेरणा मिळाली.   

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाBadmintonBadminton