शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

Shocking : फायनलपूर्वी नीरज चोप्राचा भाला घेऊन पाकिस्तानी खेळाडू भटकत होता अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 14:56 IST

भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले.

भारताच्या नीरज चोप्रानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत इतिहास घडवला. भालाफेकपटू नीरजनं टोकियोत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील १२५ वर्षांतील हे अॅथलेटिक्समधील पहिलेच पदक ठरले. २००८नंतर पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रगीत वाजले. नीरज जेव्हा फायनलसाठी मैदानावर आला तेव्हा तो प्रचंड तणावात होता. त्याला त्याचा भाला सापडत नव्हता अन् त्यामुळे त्याचं टेंशन अधिकच वाढलं होतं. याबाबत नीरजनं TOI ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला. ( Olympic gold medalist Neeraj Chopra revealed that on the day he won the gold, he was taken a bit off guard after he could not locate his javelin) 

भालाफेकीच्या फायनलमध्ये नीरजसह पाकिस्तानचा अर्षद नदीम हाही सहभागी होता अन् त्याच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. फायनलपूर्वी भालाफेकीला जाण्यापूर्वी नीरजचा भाला गायब होता. नीरज तो भाला इकडेतिकडे शोधताना दिसला अन् तो भाला पाकिस्तानच्या नदीमच्या हातात सापडला. नीरजचा भाला घेऊन नदीम मैदानावर फिरत होता. नीरजला हे कळताच त्यानं तो त्याच्याकडून घेतला.  

नीरज काय म्हणाला, ऑलिम्पिक फायनलपूर्वी मी माझा भाला शोधत होतो, मला तो सापडत नव्हता. अचानक मला तो अर्षद नदीमच्या हाती दिसला. तो माझा भाला घेऊन मैदानावर फिरत होता. तेव्हा मी त्याला म्हणालो,''भाई तो भाला मला दे तो माझाय.. मला तो फेकायचा आहे.'' त्यानं मला तो परत केला. त्यामुळेच मला पहिल्या प्रयत्नात चांगली कामगिरी करता आली नाही.

पाहा व्हिडीओ...

नदीमच्या या कृतीमुळे नीरज नाराजच दिसत होता.  नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. अन् सुवर्णपदक पक्के केले. या कामगिरीमुळे नीरजनं जागतिक भालाफेक क्रमवारीत १४ स्थानांनी झेप घेताना थेट दुसरा क्रमांक पटकवला आहे. त्याच्या खात्यात आता १३९५ गुण जमा झाले असून जर्मनीचा जोहानेस वेट्टर हा १३९६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे वेट्टरला ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. मार्सिन क्रुकोवस्की ( १३०२) तिसऱ्या, टोकियोत रौप्यपदक जिंकणारा जाकूब व्हॅड्लेजच ( १२९८०) चौथ्या आणि ज्युलियन वेबर ( १२९१) पाचव्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021