शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Tokyo Olympics: सुवर्ण उत्सव! शेवटचा दिस ‘गोल्ड’ झाला; नीरजने इतिहास घडवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 06:04 IST

१३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये वाजली भारतीय राष्ट्रगीताची धून

टोकियो : तब्बल शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेली भारताच्या अ‍ॅथलेटिक्समधील सुवर्ण पदकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपली. नीरज चोप्रा याने भालाफेकीत सुवर्ण फेक करत भारताला अ‍ॅथलेटिक्स फील्ड अ‍ॅण्ड ट्रॅक प्रकारात पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. भारतासाठी हा दिवस सुवर्ण उत्सवी ठरला. दुसरीकडे कुस्तीत सुवर्ण पदकाची संधी हुकल्यानंतर बजरंग पुनियाने कांस्य पदकावरील पकड अजिबात ढिली केली नाही. यामुळे भारतासाठी शनिवारचा दिवस अत्यंत जल्लोषाचा ठरला.नीरजने इतर खेळाडूंना दिली नाही एकही संधीअंतिम फेरी   सहापैकी दुसरा प्रयत्न सर्वोत्तमपहिला     ८७.०३ मीटरदुसरा    ८७.५८ मीटरतिसरा    ७६.७९ मीटर चौथा    फाऊलपाचवा    फाऊलसहावा    ८४.२४ मीटरऐतिहासिक कामगिरी २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने बिंद्राच्या कामगिरीशी बरोबरी करताना तो ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा दुसरा भारतीय ठरला.महाराष्ट्राशी नाते! रोड मराठा समाजातील युवकाने मिळवून दिले जगज्जेतेपदनागपूर : नीरज चोप्रा याने टोकिओत सुवर्णपदक जिंकले आणि हरयाणा, दिल्लीत नीरज चोपडे यांचे अभिनंदन, असे संदेश सुरू झाले. त्याचे कारण पानिपतजवळच्या खंदरा गावचा रहिवासी असलेल्या नीरज चोप्राचे मूळ महाराष्ट्रात आहे. १७६४ च्या तिसऱ्या पानिपत युद्धातून वाचलेले सगळ्या जाती-समाजाचे लोक हरयाणात रोड मराठा म्हणून ओळखले जातात. सोनीपत, पानीपत, कुरूक्षेत्र, कर्नाल, कैथल आणि जिंद या सहा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने राणे, भोसले, चोपडे, मुळे, महले वगैरे आडनावे असलेला हा समाज राहतो. शेती, दुग्धउत्पादन हा त्यांचा मुख्य व्यवसाय. नीरजचे कुटुंबही शेतीव्यवसायातच आहे. २०१५ मध्ये जागतिक ज्युनिअर स्पर्धेत नवा विक्रम नोंदविल्यापासून प्रत्येक मुलाखतीत तो रोड मराठा समाज व कुटुंबांच्या शेती व्यवसायाचा आवर्जून गौरवाने उल्लेख करीत आला आहे.रोड मराठा समाज पंधरा वर्षांत अ. भा. मराठा जागृती मंच नावाने संघटित झाला आहे. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्त्वातील मराठा सेवा संघ, संभाजी व जिजाऊ ब्रिगेडच्या मदतीने दिल्ली, पानीपत येथे मोठे कार्यक्रम होतात. त्याचे प्रमुख पदाधिकारी कमलजीत महले ‘लोकमत’शी बोलताना नीरजच्या यशाने आनंदून गेले होते. ते म्हणाले की, सहा अर्जुन पुरस्कारविजेते दिल्याचा रोड मराठा समाजाला अभिमान आहे.नीरजवर बक्षिसांचा वर्षावहरयाणा सरकारकडून ६ कोटी रुपयांचा रोख पुरस्कारहरयाणा सरकारमध्ये क्लास वन अधिकाऱ्याची नोकरीजमीन खरेदीसाठी ५०% सूट नीरजचे शहर पंजकूला येथे क्रीडा केंद्र उभारणार

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021