शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Tokyo Olympic : 38 वर्षीय मेरी कोमचे सॉलिड पंच; 23 वर्षीय युवा प्रतिस्पर्धीची केली हालत खराब, Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 18:00 IST

Tokyo Olympics 2020: टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली

Tokyo Olympics: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा दिवस हा भारतीयांसाठी काही खास राहिला नाही. टेबल टेनिसपटू मनिका बात्राचा शानदार विजय, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची आगेकूच अन् बॉक्सर मेरी कोमचा विजयी पंच... हे वगळता भारताच्या वाटेला आज निराशाच आली. हॉकीत पदकाचे स्वप्न पाहणाऱ्या पुरुष संघाला ऑस्ट्रेलियाकडून 7-1 असा दारूण पराभव पत्करावा लागला. जलतरपणू श्रीहरी नटराज व माना पटेल यांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आलं. ( Tokyo Olympics: Mary Kom storms into Round of 16)

बॉक्सर मेरी कोमनं 51 किलो वजनी गटात डॉमनिकन रिपब्लिकच्या मिग्यूएलिना गार्सियावर 4-1 असा सहज विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  पहिल्या दोन राऊंडनंतर गुणतालिका 19-19 अशी समसमान होती, परंतु त्यानंतर 38 वर्षीय मेरीनं सर्व अनुभव पणाला लावला अन् वयानं 15 वर्षांनी लहान असलेल्या प्रतिस्पर्धीला गार केले.  मेरीनं 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

पाहा व्हिडीओ...  टेबलटेनिसपटू मनिका बात्रा हिनं दमदार पुनरागमन करताना मिळवलेला विजय हा लक्षवेधी ठरला. यूक्रेनच्या मार्गारिटा पेसोत्स्कानं पहिले दोन गेम सहज जिंकले. त्यामुळे मनिकाचे कमबॅक अशक्यच वाटत होते. मार्गारिटानं 11-4, 11-4 असा गेम जिंकून 2-0 अशी घेतलेली आघाडी मनिकाला मोठणे आव्हानात्मक होते, परंतु तिनं तिसऱ्या गेममध्ये 11-7 असा विजय मिळवत सामन्यातील चुरस वाढवली. चौथ्या गेममध्ये कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. 11 मिनिट चाललेल्या या गेममध्ये मनिकानं 12-10 अशा विजयासह सामना 2-2 असा बरोबरीत आणला.

मनिकाचा हा कमबॅक पाहून युक्रेनची खेळाडू गोंधळली आणि चुकांमागे चुका करत गेली. पण, पाचवा गेम 11-8 असा घेत तिनंही आव्हान दिले. सहाव्या गेममध्ये मनिका 2-5 अशी पिछाडीवर होती आणि तिनं सलग 9 गुण घेत हा गेम 11-5 असा नावावर करून सामना 3-3 असा बरोबरीत आणल्या. सातव्या गेममध्ये मनिकानं 7 मिनिटांत युक्रेनच्या खेळाडूवर 11-7 असा विजय मिळवूत 4-3 अशी बाजी मारली.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग