शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
4
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
5
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
6
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
7
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
8
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
9
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
10
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
11
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
12
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
13
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
14
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
15
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
16
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
17
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
18
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
19
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
20
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा

Tokyo Olympics: लवलिनाचं 'सोनेरी' स्वप्न भंगलं, पण 'ब्राँझ'वर नाव कोरलं; उपांत्य फेरीत विश्वविजेत्या बॉक्सरकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 11:22 AM

Lovelina Borgohain, Tokyo Olympics Update: भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या उपांत्य लढतीत विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टोकियो - भारताची आघाडीची बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन हिला आज झालेल्या महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्य लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिला तुर्कस्थानच्या विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेलीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकासाठी दावेदारी सादर करण्याचे लवलिनाचे स्वप्न भंगले आहे.

आज झालेल्या उपांत्य लढतीत लवलिना हिला अपेक्षेनुसार खेळ करता आला नाही. विश्वविजेत्या बुसेनाज सुरमेनेली हिने पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी लवलिनावर वर्चस्व राखले. अखेर तिन्ही फेऱ्यांमध्ये विजय मिळवत बुसेनाज सुरमेनेलीने सामन्यात विजय मिळवला.   

ऑलिम्पिकमध्ये लवलिना बोर्गोहाईनने जर्मनीची अऩुभवी बॉक्सर नॅडीने अॅपेत्झवर 3-2 असा रोमहर्षक विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर लवलिनाने महिलांच्या ६९ किलो वजनी गटात तैवानच्या निएन चिन चेनवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली होती

दरम्यान,  टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या लढतींना सुरुवात झाल्यापासून भारतीय कुस्तीपटूंचा दबदबा दिसून येऊ लागला आहे. आज झालेल्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या लढतींमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर आज सकाळी झालेल्या पुरुषांच्या भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने जबरदस्त कामगिरी करत दिमाखात अंतिम फेरी गाठली. अ गटात समावेश असलेल्या नीरजने पहिल्याच प्रयत्नात तब्बल ८६.६५ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले. मात्र भालाफेकीच्या पात्रता फेरीत ब गटात समावेश असलेल्या भारताच्या शिवपाल सिंह याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. 

टॅग्स :Lovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईंboxingबॉक्सिंगindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021