शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Tokyo Olympics: स्वप्नभंग! भारताला मोठा धक्का, तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 11:57 IST

Deepika Kumari News: जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला महिलांच्या तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टोकियो - तिरंदाजीमध्ये पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहत असलेल्या भारताला आज मोठा धक्का बसला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला महिलांच्या तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून, ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले आहे. ( Big blow to India, Deepika Kumari loses in the quarter-finals of archery)

आज दीपिका कुमारी आणि कोरियाची सॅन अॅन यांच्यात झालेल्या लढतीमध्ये दीपिकाचा फॉर्म दिसलाच नाही. तिचा बऱ्याचदा तिचा निशाणा भरकटलेला दिसला. पहिल्या सेटमध्ये सॅन अॅनने तीनवेळा फरफेक्ट १० निशाणा साधत सेट जिंकला. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेटही सॅन अॅनच्या नावे राहिला. त्यामुळे तिने दीपिकाचे आव्हान सहजपणे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली.

दरम्यान, आज सकाळी झालेल्या लढतीत दीपिका कुमारीने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक शुटआऊटमध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पाच सेटनंतर दोन्ही तिरंदाजांमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. त्यानंतर दीपिकाने या दबावाचा यशस्वीपणे सामना करत शूटऑफमध्ये परफेक्ट १० स्कोअर केला आणि रियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदत विजेतीचे आव्हान परतवून लावले होते.

एका निशाण्यावर निर्णय होणाऱ्या शूटऑफमध्ये रशियन तिरंदाज पेरोव्हा ही दबावाखाली दिसली. तिला केवळ ७ गुण मिळवता आले. तर दीपिकाने परफेक्ट १० स्कोअर करत पेरोव्हा हिला ६-५ अशा फरकाने पराभूत केले. यी विजयासह ऑलिम्पिक तिरंदाजीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भारताची पहिली तिरंदाज ठरली होती. 

टॅग्स :Deepika Kumariदीपिका कुमारीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021