शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya : खुब लढा शेर!; रवी कुमार दहियाची सुवर्णपदकाच्या सामन्यात झाली हार, पण जिंकली मनं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 16:48 IST

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya gets Silver medal : ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला.

Tokyo Olympic, Ravi Kumar Dahiya GOLD medal bout : नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक  सुवर्णपदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडूचा मान कुस्तीपटू रवी कुमार दहियाला पटकावण्यात अपयश आलं. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय मल्लाला रशियाच्या युगूएव्ह झाव्हूरकडून पराभव पत्करावा लागला. रवी कुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे हे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचवे पदक आहे. दोन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला रवी कुमार दहियानं कडवी टक्कर दिली.  ( Ravi Kumar Dahiya gets Silver medal; gave his absolute best before going down fighting to 2 time reigning World Champion Zaur Uguev 4-7 in Final. Its 2nd Silver medal for India & 5th medal overall at Tokyo.)

रवी कुमार आणि युगूएव्ह यांनी पहिल्या मिनिटाला बचावात्मक खेळ केला. रवीनं पकड करण्याचे प्रयत्न प्रतिस्पर्धी खेळाडूनं अपयशी ठरवले अन् पहिला गुणही घेतला. ( Ravi Kumar Dahiya vs Zavur Uguev of ROC in men's freestyle 57kg final)  रशियन खेळाडूनं दोन वेळा रवीला रिंगबाहेर काढून गुण पदरात पाडून घेतले. पण, रवीनं तिसऱ्या मिनिटाला याची भरपाई केली अन् रशियन खेळाडूला उतानी पाडून २-२ अशी बरोबरी मिळवली. रशियन खेळाडूनंही जबरदस्त पकड करताना पुन्हा ४-२ अशी आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांत ही आघाडी कायम राखली. ( Ravi trailing 2-4 at end of 1st period). दुसऱ्या सत्रात दोन्ही खेळाडू आक्रमक पवित्र्यात दिसले. रशियन खेळाडूनं पुन्हा एकदा रवीला रिंगबाहेर नेले व आघाडी ५-२ अशी मजबूत केली. रवीला रशियन खेळाडू स्वतःची पकड करूच देत नव्हता. रशियन खेळाडूनं आक्रमकता वाढवताना आघाडी ७-४ अशी आणखी मजबूत केली. रवीनं पकड केली होती परंतु पंचांनी आऊट साईट एरिया देत त्याला गुण नाकारले. 

गुरुवारचा दिवस हा भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद खिळवणारा ठरला. ज्या भारतीय हॉकी संघाच्या ऑलिम्पिक सुवर्ण काळाबद्दल आपल्यापैकी अनेकांनी फक्त ऐकले होते, तो सुवर्णकाळ नव्यानं सुरू होताना आज सर्वांनी पाहिला. १९८० नंतर भारतीय पुरूष हॉकी संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक नावावर केले. भारतानं बलाढ्य जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवला. पण, या विजयानंतर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या कामगिरीकडे. विनेशनं पहिला सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, परंतु त्यापलीकडे तिला जाता आले नाही. रिपीचेज राऊंडमधून संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, तिही मावळली.  हॉकीनंतर भारतीयांना कोणत्या सामन्याची उत्सुकता होती, तर ही रवी कुमार दहिया याची... २०१२नंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत पहिले पदक जिंकून देण्याचा मान रवी कुमारनं पटकावला. त्यानं उपांत्य फेरीत  कझाकिस्तानच्या सनायेव्ह नुरीस्लॅम याचा पराभव केला. यावेळी रडिचा डाव खेळत त्याने रवीच्या दंडावर चावा घेतला. त्याने घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरला.

रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सोनीपत येथे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. ''तो सुवर्णपदक जिंकेल, असा देशवासियांना विश्वास आहे. इथे सणासारखे वातावरण आहे,''असे रवीचे वडील राकेश दहिया यांनी सांगितले. 

रवी कुमार दहियाच्या यशामागे वडिलांचा वाटा!आज रवी दहिया (Ravi Dahiya ) याच्या या यशामागे वडिलांचा दीर्घ संघर्ष आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीचे डावपेच शिकत असलेला आपला मुलगा कमकुवत पडू नये, म्हणून वडील राकेश दहिया हे रोज 70 किलोमीटरचा प्रवास करून त्याच्यासाठी दूध आणि लोणी घेऊन जात आणि त्याच्या सर्व गरजा पूर्ण करत.  राकेश दहिया स्वतः एक पैलवान होते - राकेश दहिया हे स्वतःच एक पैलवान राहिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवावे असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Wrestlingकुस्ती