शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic : महाराष्ट्राच्या प्रविण जाधवचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात; दीपिका कुमारी उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 15:59 IST

Tokyo Olympic : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधव याला पराभवाचा सामना करावा लागला. मिश्र, पुरुष सांघिक प्रकार आणि पुरुष वैयक्तिक गटात प्रविणनं चांगली कामगिरी केली.

Tokyo Olympic : महाराष्ट्राचा तिरंदाज प्रविण जाधव याचा टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आला. मिश्र, पुरुष सांघिक प्रकार आणि पुरुष वैयक्तिक गटात प्रविणनं चांगली कामगिरी केली. त्याला वैयक्तिक प्रकाराच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. रिओ ऑलिम्पिक २०१६ मधील कांस्यपदक विजेता अमेरिकेचा ब्रँडी एलिसन याच्याकडून पराभव पत्करावा लागला. एलिसनसमोर प्रविणनं सपशेल शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली अन् त्याला ०-६ अशी हार मानावी लागली. दुसरीकडे महिला वैयक्तिक गटात भारताच्या दीपिका कुमारीनं उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले.  प्रविणनं पहिल्या फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या बझारपोव्ह गॅल्सनवर मात करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. प्रवीण जाधव याने राऊंड ऑफ ३२ मध्ये बझारपोव्ह गॅल्सनचा ६-० अशा फरकाने धुव्वा उडवला. तरुणदीप राय यानंही पहिल्या फेरीत यूक्रेनच्या हुनबीन ओलेक्सीवर ६-४ असा संघर्षमयी विजय मिळवला, परंतु दुसऱ्या फेरीत इस्रायलच्या शॅनी इटली यानं टाय ब्रेकरमध्ये ६-५ अशा विजयासह तरुणदीपचे आव्हान संपुष्टात आणले.  महिला वैयक्तिक गटात दीपिकानं विजयी घोडदौड कायम राखली. पहिल्या फेरीत तिनं भुटानच्या कर्मावर ६-० आणि दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या मुसिनो-फर्नांडेझ जेनीफरवर ६-४ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  प्रविण जाधवची कामगिरी?टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रविण जाधवनं मिश्र गटात दीपिकासह चायनीस तैपेईच्या संघावर ५-३ असा विजय मिळवला, परंतु उपांत्यपूर्व फेरीत कोरियाकडून भारतीय जोडीला ६-२ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष सांघिक गटात अतनु दास, तरुणदीप यांच्यासह प्रविणनं पहिल्या फेरीत कझाकस्तान संघाचा ६-२ असा पराभव केला, परंतु दुसऱ्या फेरीत कोरियाकडून ६-० अशी हार मानावी लागली. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Team Indiaभारतीय क्रिकेट संघ