शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Big News : भारतीय हॉकी महिला संघाला ऐतिहासिक उंची गाठून दिल्यानंतर रिअल लाईफमधील 'कबीर खान'नं सोडलं प्रशिक्षकपद! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 18:28 IST

Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरी केली.

Tokyo Olympic 2020 : Sjoerd Marijne steps down  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. शुक्रवारी झालेल्या कांस्यपदकाच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला संघाचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय संघाला ४-३ असा पराभव पत्करावा लागला.  ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने ३-२ अशी आघाडी घेतली, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल करत ग्रेट ब्रिटनने हा सामना ४-३ असा फरकाने जिंकला. भारताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय महिलांची १९८०नंतरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

१९८०च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सहा संघांमध्ये भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी भारतीय महिला २०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये खेळल्या, परंतु त्या १२व्या स्थानावर राहिल्या. टोकियोत मात्र सलग तीन सामने गमावल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला संघाला अर्जेंटिनाकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनला खेळाडूंनी कडवी झुंज दिली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिज्ने यांनी राजीनामा दिला.  कांस्यपदकाच्या लढतीनंतर मरिज्ने म्हणाले, भारतीय महिला हॉकी संघासोबतचा हा माझा शेवटचा सामना होता. '' २०१७ मध्ये डच प्रशिक्षकानं महिला संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली. मरिज्ने यांनी ट्विट केले की,''आम्ही पदक जिंकू शकलो नाही, परंतु माझ्यामते आम्ही त्यापेक्षा काहीतरी अधिक जिंकलो आहोत. भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी आम्ही करून दाखवली आणि अनेक मुलींना प्रेरणादायी कामगिरी केली. स्वप्न पूर्ण होतात. त्यासाठी मेहनत करण्याची आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवण्याची गरज आहे, हे आम्ही अनेक मुलींना शिकवले.''    

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Hockeyहॉकी