शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Tokyo Olympic, Neeraj Chopra : हरयाणा सरकारकडून नीरज चोप्राला ६ कोटी; बीसीसीआयनं पदकविजेत्यांसाठी उघडला खजिना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 20:22 IST

Tokyo Olympic 2020 : २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंच्या स्पर्धा शनिवारी संपल्या. भारताची गोल्फपटू अदिती अशोक हिनं पदकाच्या आशा उंचावल्या होत्या, परंतु तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर दुपारच्या सत्रात कुस्तीपटू बजरंग पुनियानं कांस्यपदक नावावर केले. त्यानंतर सायंकाळी नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी केली. भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. १२५ वर्षांत अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले. नीरजच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरयाणा सरकारनं त्याला ६ कोटी बक्षीस देण्याची घोषणा केली. BCCI नेही टोकियोतील पदक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्याची घोषणा केली. ( Haryana announces Rs 6 cr for Neeraj; Punjab CM hails golden boy) 

नीरज चोप्रानं सुवर्ण पदकासह पाकिस्तानच्या अर्षद नदीमलाही लोळवलं, बघा कितव्या स्थानावर फेकलं!

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (  Haryana Chief Minister Manohar Lal Khattar ) यांनी नीरज चोप्राचे कौतुक केले. ते म्हणाले, या सुवर्णक्षणाची देशवासीयांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती आणि संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे. नीरज चोप्रानं इतिहास घडवला.''  

नीरजने आज सुवर्णपदक जिंकून भारताला टोकियोत एकूण ७ वे पदक जिंकून दिले. टोकियोत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्यपदक जिंकून पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ कुस्तीपटू रवी कुमार दहिया ( रौप्य), बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, भारतीय पुरुष हॉकी संघ, बॉक्सिंगपटू लवलिना बोरगोईन व कुस्तीपटू बजरंग पुनिया ( सर्वांनी कांस्य) यांनी पदकाची कमाई केली. भारतीय संघ ४७व्या क्रमांकावर आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला १ कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी ५० लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला १.२५ कोटी रुपये देणार आहे.  ( The BCCI announces prize money of 1cr for Indian Olympic Gold Medalist Neeraj Chopra.)

 

  • केंद्र सरकारकडून ७५ लाख
  • हरयाणा सरकारकडून ६ कोटी
  • पंजाब सरकारकडून २ कोटी
  • मनिपूर सरकारकडून १ कोटी
  • बीसीसीआयकडून १ कोटी 
  • चेन्नई सुपर किंग्सकडून १ कोटी 
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्राBCCIबीसीसीआयPV Sindhuपी. व्ही. सिंधूMirabai Chanuमीराबाई चानूLovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईं