शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रा अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताचा १०० वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 15:58 IST

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा दिवस आहे आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया व भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत.

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आज भारताचा शेवटचा दिवस आहे आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया व भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत. गोल्फपटू अदिती अशोकनं दिग्गज खेळाडूंना टक्कर देताना दिसली, परंतु थोडक्यात तिचे कांस्यपदक हुकले. तिनं चौथे स्थान पटकावले, परंतु ऑलिम्पिक इतिहासात गोल्फमध्ये भारतीय खेळाडूनं केलेली ही सर्वोत्तम व ऐतिहासिक कामगिरी आहे. आता सर्वांचे लक्ष बजरंग व नीरज यांच्याकडे आहे. नीरजने आज पदक जिंकेल्या, ऑलिम्पिकमधील भारताची १०० वर्षांची पदकांची प्रतीक्षा संपणार आहे. 

नीरज चोप्रा आज भालाफेकीच्या फायनलमध्ये उतरणार आहे. २३ वर्षांच्या नीरजनं क्वालिफिकेशन फेरीत ८६.५९ मीटर लांब भाला फेक करून अंतिम फेरीत ऐटीत प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक ( १९००) स्पर्धेत २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. 

मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६० व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. चोप्रानं यावर्षी ८८.०७ मीटर लांब भाला फेक करून ऑलिम्पिकची पात्रता निश्चित केली होती. क्वालिफाईंग राऊंडमध्ये त्यानं सुवर्णपदकाचा दावेदार आणि २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेता जर्मनीचा योहानेस वेटरला मागे टाकले होते. पदकाचे काही दावेदार पात्रता फेरीतच बाहेर झाले.  

१९२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाच सदस्यीय भारतीय संघात ट्रॅक अँड फिल्डमधील तीन खेळाडूंचा सहभाग होता. अन्य दोघं ही कुस्तीपटू होती आणि तेव्हा भारताला एकही पदक मिळालेले नव्हते.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Neeraj Chopraनीरज चोप्रा