मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यप्रणालीाध्ये पारदर्शकपणा आणण्यासाठी लोढा समितीद्वारे सुचवलेल्या शिफारशींना मान्य केल्यानंतर बीसीसीआयशी संलग्न सर्वच संघटना ‘बॅकफुट’वर गेल्या आहेत. अशातच मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए)देखील यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे ठरवले असून रविवारी (दि. २४) याबाबत एमसीए चर्चा करणार आहे.ज्येष्ठ राजकीय नेते व अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एमसीएची कार्यकारिणी समितीसह एमसीए पॅनलच्या सर्व सदस्यांना घेतलेल्या निर्णयाची एक प्रत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाने एमसीएवर मोठा परिणाम होणार आहे. या निर्णयानुसार खुद्द पवार अध्यक्षपदासाठी अयोग्य ठरले आहेत.
एमसीएची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज बैठक
By admin | Updated: July 24, 2016 04:18 IST