शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या बॉक्सरवर कुल्फी विकण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 11:58 IST

देशाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंवर त्या काळापुरते कौतुक होते, बक्षीसांची घोषणा होते. मात्र, काळ लोटल्यानंतर त्या खेळाडूंचा विसर पडतो.  

ठळक मुद्देदिनेश कुमार; कर्ज फेडण्यासाठी सुरु आहे लढाई

भिवानी : अनेक राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्चस्व गाजवलेल्या हरियाणाच्या दिनेश कुमारला आपल्या घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे रस्त्यावर कुल्फी विकावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर दिनेशची बॉक्सिंग कारकिर्द संपुष्टात आली. यानंतर उपचारासाठी आणि खेळासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तो आपल्या वडिलांसह कुल्फी विकतोय.दिनेशने बॉक्सिंग कारकिर्दीत राष्ट्रीय  स्तरावर १७ सुवर्ण पदकं, एक रजत पदक आणि ५ कांस्य पदकं अशी २३ पदकांची कमाई केली आहे. वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फिटावं आणि आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून दिनेश कुल्फी विकत आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात दिनेश जायबंदी झाला. यामुळे त्याचे बॉक्सिंग करिअरच संपुष्टात आलं. दिनेशवर उपचार करण्यासाठी त्याच्या वडिलांना कर्ज घ्यावे लागले. या कर्जाआधी वडिलांनी दिनेशच्या बॉक्सिंग सरावासाठीही कर्ज काढले होते.  दिनेशच्या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर कर्जाचे ओझे वाढले. दिनेशने सरकारकडे मदतीची मागणी, सरकारी नोकरी मिळावी म्हणून अर्जही केले. मात्र, कोणतीही मदत न मिळाल्याने दिनेश कुमारला त्याच्या वडिलांसोबत कुल्फी विकावी लागते आहे. 

एकसारख्या नावामुळे झाला गोंधळ..रस्त्यावर कुल्फी विकण्याची वेळ आलेला बॉक्सर आणि आशियाई स्पर्धेत भारतासाठी रौप्य पटकावणारा बॉक्सर या दोघांची नावे एकसारखी असल्याने रविवारपासून विविध प्रसारमाध्यमांमध्ये गोंधळ उडालेला दिसून आला. अनेक वृत्तांमध्ये देण्यात आले की, आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केलेला, आशियाई स्पर्धेतील पदक विजेता आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त बॉक्सर दिनेश कुमारवर कुल्फी विकण्याची वेळ आली. मात्र ज्या दिनेशने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली, तो हरियाणा पोलीसमध्ये चांगल्या पदावर कार्यरत असून रस्त्यावर कुल्फी विकणारा बॉस्कर दिनेश हा राष्ट्रीय स्तराचा खेळाडू आहे.

पाहा व्हिडीओ

टॅग्स :boxingबॉक्सिंग