नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत दुपारच्यावेळी सुसाट वारा आणि पुन्हा पावसाच्या आगमनापूर्वी आकाश अंतिल (नाबाद १३४) याच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर आऱपी़ अकॅडमीने के़एऩ कोल्टसचा आठ विकेट्ने पराभव करीत ३९ व्या रघुवीर सिंग हॉट वेदर क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली़ के़एऩ कोल्टसने ३५़१ षटकात २२१ धावा केल्या़ यात शिवम शर्मा ५४, माधव कौशिक ५१ तर मनोज डागर यांच्या ५० धावांचा समावेश आहे़ प्रत्युत्तरात आऱ पी़ अकॅडमीने ३३़१ षटकात २ विकेट्सवर २२२ धावा करीत सहज विजय नोंदवला़ यात आकाश अंतिलने ९३ चेंडूवर नाबाद १३४ धावा केल्या़ यात ८ चौकार आणि १० षटकाराचा समावेश आहे़
आकाशचे धडाकेबाज शतक
By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST