फेडरर तिसऱ्या फेरीत

By Admin | Updated: July 8, 2017 01:21 IST2017-07-08T01:21:45+5:302017-07-08T01:21:45+5:30

सात वेळेसचा चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली

In the third round of Federer | फेडरर तिसऱ्या फेरीत

फेडरर तिसऱ्या फेरीत

लंडन : सात वेळेसचा चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली. त्याने गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत सर्बियाच्या डुसान लाजोविक याचा पराभव केला.
पुढील महिन्यात ३६ वर्षांचा होणाऱ्या फेडररने लाजोविक याचा ७-६ (0), ६-३, ६-३, असा पराभव केला. जागतिक क्रमवारीतील ७९ व्या मानांकित लाजोविक पहिल्या सेटमध्ये फेडररची दोनदा सर्व्हिस भेदताना २-0 अशी आघाडी घेतली होती; परंतु फेडररने लगेच मुसंडी मारली. पहिला सेट जिंकल्यानंतर फेडररने प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवला आणि ३-१ ने आघाडी घेतली. त्यानंतर १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद आपल्या नावावर करणाऱ्या फेडररने मागे वळून पाहिले नाही आणि सहजपणे तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सामन्यानंतर फेडरर म्हणाला, ‘पहिल्या सेटमध्ये मला संघर्ष करावा लागला. मी आपली सर्व्हिस चांगली करू शकलो नव्हतो. त्यानंतर मी चांगली मुसंडी मारली.’ फेडररचा पुढील सामना २७ व्या मानांकित जपानच्या ज्वेरेव्ह याच्याविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: In the third round of Federer