शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

'मंझिलें और भी है!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 03:41 IST

क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना आगामी वर्षात भारताचे क्रीडा क्षेत्रात यश वाढण्याची खात्री

अनेक भारतीयांनी गेल्या वर्षात अभिमानास्पद कामगिरी केली. यात पी. व्ही. सिंधू, बी. साई प्रणीत, मानसी जोशी, विनेश फोगट, दीपक पुनिया, बजरंग पुनिया, राहुल आवारे, विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदकांची लयलूट करणारे भारतीय नेमबाज, ‘गोल्डन गर्ल’ धावपटू हिमा दास, जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण जिंकणारी दूती चंद यांच्यासह अनेकांचा उल्लेख करता येईल.भारतीयांमधील गुणवत्ता... ते घेत असलेले परिश्रम आणि यासह त्यांना मिळणारी सरकारची सर्वतोपरी साथ या त्रिसूत्रीच्या जोरावर यशाची ही पताका २०२० मध्ये आणि त्यापुढील काळात आणखी उंचावत जाणार, याची खात्री आहे,’ अशा शब्दांत भारतीय क्रीडाक्षेत्राचे २०१९ मधील यश सांगतानाच राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी २०२० मध्ये भारतीय खेळाडू यशाचे नवे आयाम गाठतील, याची खात्री दिली. बकोरिया यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना २०२० मध्ये क्रीडा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.अलीकडे आपल्या देशात आरोग्याबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचे निरीक्षण नोंदवताना बकोरिया म्हणाले, ‘अगदी ग्रामीण भागातही पहाटे फिरायला जाणे व व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आरोग्य आणि खेळ यांचे नाते अतिशय जवळचे आहे. खेळाडूंसोबतच सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुष वेळ मिळेल तेव्हा घाम गाळताना दिसतात. ‘फिट इंडिया’ मोहिमेचा मोठा फायदा झाला. समाज आरोग्याबाबत जागरूक होणे, हे क्रीडा संस्कृती विकसित होण्यास पोषक असते. हे पाहता भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर आणखी भरीव कामगिरी करणार, अशी मला खात्री आहे.’केंद्र व राज्य सरकार खेळाडूंसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहे. याचा सकारात्मक परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असल्याचे सांगताना बकोरिया म्हणाले की, ‘कामगिरी उंचावण्यास खेळाडूंना सातत्याने स्पर्धात्मक वातावरण मिळणे गरजेचे आहे. ते मिळावे म्हणून विशिष्ट खेळात ज्या राज्याचे वर्चस्व असेल, तेथील खेळाडूंसोबत देशातील इतर गुणवान खेळाडूंना स्पर्धात्मक सरावाची जास्तीत जास्त संधी मिळायला हवी. महाराष्ट्राचा क्रीडा विभागही त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. आंतरअकादमी स्तरावरही असा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. प्रशिक्षकांनी स्वत:ला अपडेट ठेवायला हवे. ही गोष्ट खूपच महत्त्वपूर्ण आहे.’बेबी लीगपुढील ३ आॅलिम्पिकसाठी खेळाडू घडविण्याच्या योजनांचा एक भाग म्हणून या वर्षीपासून ८, १० आणि १२ वर्षांखालील खेळाडूंसाठी राज्य स्तरावर ‘बेबी लीग’चे आयोजन करण्यात येत आहे. यात फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन आणि जिम्नॅस्टिक यांचा समावेश असेल. प्रथम जिल्हा पातळीवर ही लीग होईल. यात चमकणारे खेळाडू राज्य स्तरावर खेळतील. त्यात यश मिळविणाºया खेळाडूंना भविष्याच्या दृष्टीने तयार करण्याची योजना असल्याचे बकोरिया म्हणाले.गो गर्ल्स गो‘टीन एज’ मुलींमध्ये तंदुरुस्तीबाबत जागरूकता वाढावी, हा उद्देश ठेवून ‘गो गर्ल्स गो’ उपक्रम २०२० पासून राज्य सरकारचा क्रीडा विभाग राबविणार आहे. ८ ते १४ वर्षांखालील मुलींना केंद्रस्थानी ठेवून पारंपरिक खेळांबरोबरच प्रचलित खेळांचा यामध्ये समावेश असेल, लवकरच यासंदर्भातील जीआर काढण्यात येईल.दिव्यांग खेळाडूंना सरावाची व्यवस्थादिव्यांग खेळाडूंनी २०१९ मध्ये आणि त्यापूर्वीही जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या सरावाच्या सोयीसाठी क्रीडा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाºया खेळाडूंना शासनाच्या क्रीडा संकुलात मोफत सरावाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.जिल्हा पातळीवर नियोजन : पुढील ३०-४० वर्षांत आपल्या भागातील आवश्यक क्रीडा सुविधांची माहिती घेऊन राज्य शासन जिल्हा पातळीवर त्यादृष्टीने योग्य नियोजन करणार आहे. क्रीडा आयुक्तांच्या माहितीनुसार, याअंतर्गत जिल्ह्याच्या मागणीनुसार ‘हाय परफॉर्मन्स गेम्स’मधील क्रीडा प्रकाराच्या मैदानापासून प्रशिक्षणापर्यंतची सोय करण्यात येईल.२०२० च्या आॅलिम्पिकसाठी नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, तिरंदाज प्रवीण जाधव आणि अ‍ॅथलिट अविनाश साबळे हे राज्यातील ४ खेळाडू पात्र ठरले आहेत. यापुढील काळात ही संख्या वाढलेली असेल, याची ग्वाही मी देतो. २०२४, २०२८ आणि २०३२ या ३ आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व वाढावे आणि आपल्या खेळाडूंनी देशाला पदके जिंकून द्यावी, यावर आपला भर असेल. यादृष्टीने बालवयातच खेळाडूंमधील गुणवत्ता हेरून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. - ओमप्रकाश बकोरिया