शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

श्रीनिवासन यांना हटवण्याचा विचार होत आहे

By admin | Updated: April 30, 2015 01:36 IST

मंडळाच्या प्रतिनिधीरूपाने असलेल्या श्रीनिवासन यांची उचलबांगडी करण्यासाठी लवकरच सर्वसाधारण सभेची विशेष बैठक आयोजित करण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत.

नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयचे नवीन पदाधिकारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मंडळाच्या प्रतिनिधीरूपाने असलेल्या श्रीनिवासन यांची उचलबांगडी करण्यासाठी लवकरच सर्वसाधारण सभेची विशेष बैठक आयोजित करण्याच्या पर्यायावर विचार करीत आहेत.श्रीनिवासन यांना बाहेर करण्याच्या निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी सर्वसाधारण सभेची विशेष बैठक बोलावण्याची आवश्यकता असणार आहे आणि दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर या पर्यायावर विचार करीत आहेत. तथापि, कोणत्या दिवशी ही सर्वसाधारण सभेची विशेष बैठक अयोजित करण्यात येणार यावर अद्याप निर्णय झाला नाही. कारण बैठक बोलावण्यासाठी सदस्यांना तीन आठवड्यांची नोटीस देणे आवश्यक असते.बीसीसीआयच्या एका सदस्याने म्हटले की, ‘श्रीनिवासन यांना बाहेर करण्यासाठी सत्ताधारी गटाला दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. जर त्यांच्या जवळ २१ संघटनांची मते नसतील, तर निश्चितपणे त्यांना सर्वसाधारण सभेची विशेष बैठक बोलावता येणार नाही. त्यामुळे दालमिया आणि ठाकूर यांना त्यांच्या बाजूने २१ मते आहेत का हे आधी चाचपडून पाहावे लागणार आहे.’ (वृत्तसंस्था)प्राप्त वृत्तानुसार २१ मे रोजी या बैठकीचे आयोजन केले जाऊ शकते. त्याच दिवशी यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना देखील होणार आहे. विशेष म्हणजे २0१0 मध्ये ललित मोदी यांना देखील आयपीएलच्या तिसऱ्या सत्राच्या अंतिम सामन्यानंतर निलंबित करण्यात आले होते. त्यामुळेच प्रकरणाचा काय निकाल लागतो याची उत्सुकता लागली आहे.