शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

"सुवर्णपदक दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे" सुप्रिया सुळे यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 18:15 IST

Vinesh Phogat Disqualified From Olympics: खासदार सुप्रिया सुळे यांनीही विनेश फोगाट हिला बाद ठरवण्याच्या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णपदक समोर दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला महिलांच्या ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम लढतीपूर्वी ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आल्याने देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारत ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या कुस्तीत अंतिम फेरीपर्यंत जाणारी विनेश ही पहिली भारतीय महिला ठरली होती. मात्र आज रात्री होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी विनेश फोगाट हिचं वजन तिच्या वजनी गटाच्या निर्धारित वजनापेक्षा अधिक आढळल्याने तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं. दरम्यान, ऑलिम्पिकमधील या निर्णयाविरोधात देशामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुवर्णपदक समोर दिसत असताना विनेशसोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

याबाबत सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की, विनेश, तू मैदानाच्या आत आणि बाहेर खेळलेली प्रत्येक लढत प्रेरणादायी आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत तुला महत्वाची लढाई तांत्रिक कारणामुळे खेळता येत नाही याचे आम्हा देशवासियांना दुःख आहे. समोर सुवर्णपदक दिसत असताना तुझ्यासोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आता या क्षणी तुझी काय मानसिकता असेल हे आम्ही समजू शकतो. तू लढवय्यी आहेस, या निराशेच्या गर्तेतून बाहेर येशील हा विश्वास आहे. विनेश, फायनल कुणीही खेळू दे पण आमच्यासाठी तूच विजेती आहेस. शुभेच्छा, असे सुप्रिया सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

दरम्यान,  पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने मंगळवारी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. सलामीच्या सामन्यात विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करतावना जपानची दिग्गज खेळाडू सुसाकी विरूद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर विनेशने उपांत्यपूर्व सामन्यात सामन्यात युक्रेनची प्रतिस्पर्धी ओक्साना लिवाच हिचा पराभव केला. तर उपांत्य सामन्यात विनेशने  क्यूबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम सामन्यात विनेशची गाठ अमेरिकन महिला कुस्तीपटू एस. हिल्डब्रांट्स हिच्याविरुद्द होणार होता. मात्र तत्पूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आलं. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळे