...तर खेळाडूंचे खच्चीकरण होईल-  प्रणॉय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:40 AM2020-04-03T00:40:11+5:302020-04-03T00:40:19+5:30

आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या फटका बसण्याची भीती

 ... then the players will be spent - Pranoy | ...तर खेळाडूंचे खच्चीकरण होईल-  प्रणॉय

...तर खेळाडूंचे खच्चीकरण होईल-  प्रणॉय

Next

नवी दिल्ली : कोरोनामुळे क्रीडाक्षेत्रातील परिस्थिती निराशादायी असून पुढील दीड महिन्यात सुधारणा न झाल्यास खेळाडू आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचून जातील, अशी भीती भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने गुरुवारी व्यक्त केली.

कोरोनाने जगात आतापर्यंत ४४ हजार बळी घेतले आहेत. अनेक देशात लॉकडाऊन आहे. बॅडमिंटनसह जगातील अनेक खेळांच्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामुळे खेळाडूंमध्ये आर्थिक तसेच मानसिक ग्लानी निर्माण झाली असल्याचे मत प्रणॉयने व्यक्त केले.
राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता असलेला एच. एस. प्रणॉय हसीना सुनील कुमार (पूर्ण नाव) म्हणाला, ‘कुठल्याही उद्योगासाठी ही वेळ फार कठीण आहे. कोरोनामुळे उत्पादन बंद असल्याने नफ्यावर परिणाम होत आहे. याचा फटका खेळाडूंना बसला. अनेक कंपन्या खेळाडूंच्या प्रायोजक आहेत. यामुळे खेळ आणि खळाडूंवर विपरित परिणाम होत चालला आहे.

प्रायोजकांनी अन्य खेळांवर देखील मोठी गुंतवणूक केली आहे, मात्र खेळ बंद पडल्यामुळे बॅडमिंटनसह सर्वच खेळ प्रभावित झाले. खेळाडूंना आता काहीच ठिकाणांहून अत्यल्प कमाई होत आहे. ती देखील थांबल्यास खेळाडूंपुढे मोठे संकट उभे राहणार याची मला जाणीव आहे. पुढील दीड महिन्यात परिस्थिती पूर्ववत होईल, अशी मी प्रार्थना करीत आहे.’

अनेक ग्रॅन्डस्लॅमची विजेती असलेली अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्स आणि आॅस्ट्रेलियाचा दिग्गज जलतरणपटू मायकेल फेल्प्स यांच्यासह अनेक खेळाडूंनी ‘लॉकडाऊन’मुळे खेळाडूंची मानसिकता खचत असल्याची भीती आधीच व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

समस्येकडे सकारात्मक दृष्टीने बघावे

४ प्रणॉय पुढे म्हणाला,‘ अनेक खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत, माझ्यामते ८० टक्के खेळाडू मैदानावर परतण्यास उत्सुक दिसतात. ही समस्या केवळ खेळाडूंपुरती मर्यादित नाही तर जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी मानसिक समस्या बनली आहे. मात्र सध्यातरी आमच्याकडे कुठला पर्याय नाही. आम्हाला या समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पहावे लागेल. दैनंदिन आयुष्यात जे काही करीत आहोत त्याचाच आनंद लुटायचा आहे. व्यावसायिक व्यस्ततेमुळे इतकी वर्षे जे करू शकलो नााहीत त्या गोष्टी करा. कुटुंबासोबत वेळ घालवा.’

४ विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) १७ मार्चची विश्व रँकिंग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रणॉयने या निर्णयाचे स्वागत केले. शिवाय खेळाडूंचे प्राथमिक हित निश्चित करण्यासाठी अधिक सकारात्मक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Web Title:  ... then the players will be spent - Pranoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.