शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

कसोटी पाण्यात!

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

सलग चौथ्या दिवशी पावसाने कहर केल्यामुळे भारत-बांगलादेश कसोटी अनिर्र्णीत अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. निकालाअभावी आयसीसी क्रमवारीत चौथ्या स्थानावर

फातुल्ला : सलग चौथ्या दिवशी पावसाने कहर केल्यामुळे भारत-बांगलादेश कसोटी अनिर्र्णीत अवस्थेकडे वाटचाल करीत आहे. निकालाअभावी आयसीसी क्रमवारीत चौथ्या स्थानावर घसरण्याचे संकट भारतीय संघापुढे निर्माण झाले.सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी पुन्हा एकदा पाऊस खलनायक ठरला. संपूर्ण दिवसात ३०.१ षटकांचा खेळ शक्य झाला. भारताने कालच्या ६ बाद ४६२ वर पहिला डाव घोषित केल्यानंतर बांगलादेशाने खेळ थांबेपर्यंत ३ गड्यांच्या मोबदल्यात १११ धावा फळ्यावर लावल्या. सामन्याचा अखेरचा दिवस शिल्लक आहे. हवामानाचा अंदाज पाहता रविवारी खेळ होण्याची शक्यता क्षीण असल्याने निकाल लागण्याचीही चिन्हे नाहीत. हा सामना अनिर्णीत राहिल्यास तिसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ चौथ्या स्थानावर घसरेल. द. आफ्रिका (१३०) आणि आॅस्ट्रेलियापाठोपाठ (१०८) भारत ९९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.भारत आणि न्यूझीलंडचे सारखे गुण आहेत; पण दशांशाच्या फरकाने न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे. हा सामना अनिर्णीत राहिल्यानंतर भारताचे ९७ गुण होऊन हा संघ चौथ्या स्थानावर फेकला जाईल. अखेरच्या दोन दिवसांत बांगलादेशावर दडपण आणून सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीने डाव घोषित केला. त्यादृष्टीने यजमान संघाचे ३ गडीदेखील बाद केले; पण भारताच्या आशेवर पावसाने पाणी फेरले. आॅफ स्पिनर रविचंद्रन आश्विन आणि दोन वर्षांनंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या हरभजनने बांगलादेशाच्या फलंदाजांपुढे आव्हान उभे केले. अंधुक प्रकाशामुळे उपाहाराच्या वेळेआधीच खेळ थांबविण्यात आला. सलामीचा इमरुल कायेस (नाबाद ५९) याने एकाकी झुंज देत भारतीय गोलंदाजांना तोंड दिले. त्याच्यासोबत अष्टपैलू शाकीब अल हसन खाते न उघडता नाबाद होता. कायेसने ९८ चेंडंूतील अर्धशतकी खेळीत १० चौकार मारले. आश्विनने तमीमला बाद करून पहिला धक्का दिला. तमीमने १९ धावांचे योगदान दिले. यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने त्याला बाद केले. यानंतर मोमिनुल हक आणि इमरुल कायेस यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. भज्जीने ही जोडी फोडली. भज्जीने ५४ चेंडूंवर ४ चौकारांसह ३० धावा ठोकणारा मोमिनुल हक याला उमेश यादवकडे झेल देण्यास भाग पाडून ४१४वा कसोटी बळी मिळविला. दोन धावांची भर पडत नाही, तोच मुशफिकीर रहीम हा आश्विनच्या चेंडूवर स्लिपमध्ये रोहित शर्माकडे झेल देऊन परतला. यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने खेळ होऊ शकला नाही. आश्विनने गोलंदाजीचा प्रारंभ ईशांत शर्मा आणि आश्विनकडून करवून घेतला. त्याचा हा डाव यशस्वी ठरला. ईशांतने ४ षटकांत केवळ १३ धावा दिल्या, तर आश्विनने ३० धावांत २ गडी बाद केले. कायेसला १० धावांवर जीवदान मिळाले. शिखर धवनने उमेशच्या चेंडूवर त्याचा झेल सोडला. पंचांनी चहापानानंतर खेळ होण्याची शक्यता वाटत नसल्याने दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था) धावफलकभारत पहिला डाव : ६ बाद ४६२ वर घोषित. बांगलादेश पहिला डाव : तमीम इक्बाल यष्टिचीत गो. अश्विन १९, इमरुल कायेस खेळत आहे ५९, मोमिनुल हक झे. यादव गो. हरभजन ३०, मुशफिकूर रहीम झे. रोहित गो. अश्विन २, शाकीब अल हसन खेळत आहे. १, अवांतर : १, एकूण : ३०.१ षटकात ३ बाद १११ धावा. गडी बाद क्रम : १/२७, २/१०८, ३/११०. गोलंदाजी : ईशांत ४-०-१३-०, अश्विन ११.१-२-३०-२, उमेश ४-०-३४-०, अ‍ॅरोन ४-०-११-०, हरभजन ७-०-२३-१.