शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

टेनिस सम्राट राॅजर फेडररची कारकीर्द अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 05:47 IST

ऑस्ट्रेलियन ओपनसह, विम्बल्डनमधून घेतली माघार

ठळक मुद्देगेल्या अनेक महिन्यांपासून फेडरर गुडघा दुखापतीने त्रस्त आहे. ‘गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेपर्यंत स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची आशा नाही,’ असे फेडररने सांगितले.

जिनेव्हा : टेनिस विश्वाचा सम्राट म्हणून नावाजला जाणारा स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याची शानदार कारकीर्द अंतिम टप्प्यात आली आहे. स्विस मीडियाद्वारे बुधावारी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत स्वत: फेडररने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. फेडरर सध्या ४० वर्षांचा असून, भविष्यात आता मुख्य स्पर्धांमध्ये त्याचे खेळणे कठीण दिसत असल्याने त्याची कारकीर्द अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा टेनिसविश्वात सुरू आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून फेडरर गुडघा दुखापतीने त्रस्त आहे. ‘गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेपर्यंत स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची आशा नाही,’ असे फेडररने सांगितले. फेडररने पुढे म्हटले की, ‘विम्बल्डनमध्ये मी खेळलो, तर ते अनपेक्षित ठरेल आणि हे सत्य आहे; पण मी जूनपर्यंत खेळू शकणार नाही, यात आश्चर्याचे कोणतेही कारण नाही. शस्त्रक्रिया होण्याआधीपासूनच आम्हाला कल्पना होती की, अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आम्हाला मोठ्या कालावधीच्या ब्रेकची गरज लागेल.’

    तिसरी शस्त्रक्रियाn यंदा जुलै महिन्यात फेडररला विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ ३ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला होता.  त्यानंतर त्याने एकही स्पर्धा खेळलेली नाही. n काही आठवड्यांपूर्वी त्याने शस्त्रक्रिया करून घेतली होती. n दखल घेण्याची बाब म्हणजे, गेल्या १८ महिन्यांत गुडघ्यावर झालेली ही तिसरी शस्त्रक्रिया ठरली.  n सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांमध्ये फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचसह संयुक्तपणे अव्वल स्थानी असून, यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम पटकावली आहेत.

टॅग्स :Tennisटेनिस