शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

कबड्डीमध्येही झाली ‘टेनिस एल्बो’ची एन्ट्री

By admin | Updated: March 2, 2016 03:07 IST

सर्वसामान्य भारतीयांना ‘टेनिस एल्बो’ दुखापतीचे नाव घेतल्याबरोबर सर्वप्रथम आठवतो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. २००४ साली झालेल्या या गंभीर दुखापतीमुळे सचिनला बॅट उचलणेही कठीण झाले होते

रोहित नाईक,  मुंबईसर्वसामान्य भारतीयांना ‘टेनिस एल्बो’ दुखापतीचे नाव घेतल्याबरोबर सर्वप्रथम आठवतो तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. २००४ साली झालेल्या या गंभीर दुखापतीमुळे सचिनला बॅट उचलणेही कठीण झाले होते. विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा टेनिस एल्बोची चर्चा सुरु झाली असून यावेळी क्रिकेट नव्हे तर थेट कबड्डीमध्ये टेनिस एल्बोने ‘चढाई’ केली आहे. प्रो कबड्डीतील यू मुंबाचा स्टार खेळाडू विशाल मानेला ही दुखापत झाली आहे. खुद्द विशालनेच आपल्याला टेनिस एल्बो झाल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.टेनिस एल्बोमुळे त्यावेळी सचिन क्रिकेटपासून जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्याने त्याच्या निवृत्तीचीही चर्चा सुरु झाली होती. त्यामुळेच जेव्हा या दुखापतीचे निदान झाले तेव्हा धक्काच बसल्याचे विशाल म्हणाला. ‘यंदाच्या मोसमात सुरुवातीला दबंग दिल्लीविरुध्द खेळतानात्यांच्या कोरियन खेळाडूची पकड करताना हाताला दुखापत झाली. त्यावेळी याकडे दुर्लक्ष केले. पणनंतर हात खूप दुखायला लागल्याने डॉक्टरकडे गेलो आणि कळाले कीही दुखापत टेनिस एल्बोची आहे.तेव्हा डॉक्टरांनी फर्स्ट स्टेज असल्याचे सांगून धीर दिला’, असे विशालने सांगितले.त्यादरम्यान ‘सॅग’ स्पर्धा जवळ आलेली असताना दडपण होते असे सांगताना विशाल म्हणाला ‘डॉक्टरांनी सतत आइसिंग करण्यास सांगताना वजन उचलण्यास सक्त मनाई केली. शिवाय काही सामने न खेळण्याचा सल्ला दिला. आइसिंग व वजन न उचलणे ठिक होतं, पण सामने न खेळणे मला जमणार नव्हते. सॅगमध्ये देशासाठी खेळायचे असल्याने कोणत्याही परिस्थितीत मी खेळण्याचा निर्णय घेतला होता. ‘सॅग’मध्येही तिथल्या डॉक्टरांनी चांगले उपचार केल्याने फारसा त्रास झाला नाही. मात्र मुंबईत परतल्यानंतर योग्य उपचाराचा फायदा झाला.’‘यू मुंबाचे फिजिओ एस. फ्रान्सीस यांनी जे उपचार केले त्याने खूप फरक पडला असून आता मी ८० टक्के या दुखापतीतून सावरलो आहे. फिजिओच्या सूचना नियमीत पाळत असल्याने लवकरच मी पुर्ण तंदुरुस्त होईल’, असा विश्वासही विशालने यावेळी व्यक्त केला. याआधी टेनिस एल्बोची काहीच माहिती नव्हती. जे काही ऐकले होते ते केवळ सचिन तेंडुलकरमुळे. त्यामुळेच जेव्हा डॉक्टरांनी टेनिस एल्बोची दुखापत असल्याचे सांगितले तेव्हा सर्वातआधी सचिन सरांची आठवण आली. फर्स्ट स्टेज असल्याचे कळाल्यावर यातून लवकरन सावरु शकतो असा धीर मिळाला. सध्या माझ्यावर योग्य उपचार सुरु असून मी लवकरच यातून पुर्णपणे बरा होईल.- विशाल माने, यू मुंबा बचावपटू