शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

तेंडुलकर-वॉर्र्नने घेतली रिचर्ड्सन यांची भेट

By admin | Updated: June 4, 2015 01:19 IST

सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेऊन प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी

दुबई : सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्याधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांची भेट घेऊन प्रस्तावित लीजंड टी-टष्ट्वेन्टी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. तसेच स्पर्धेचे स्वरुप कसे असेल या विषयी देखील त्यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा अमेरिकेत घेण्यात येणार आहे. आयसीसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सचिन व वॉर्न यांनी आयसीसीच्या मुख्यालयाला भेट दिली. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी रिचर्डसन यांची भेट घेतली. यात स्पर्धेच्या ब्लू प्रिंटवर चर्चा झाली. मात्र ही स्पर्धा काही व्यक्तींकडून आयोजित केली जात आहे. त्यामुळे अशा स्पर्धेला मंजुरी देण्याचा अधिकार आयसीसीला नाही. स्थानिक क्रिकेट मंडळाच्या आखत्यारीतील ही बाब आहे. आयसीसीच्या नियमानुसार स्थानिक क्रिकेट मंडळ अशा स्पर्धांना मान्यता देते व त्याची माहिती संघटनेला कळविते. एस्सेल समुहाने आयोजित केलेल्या इंडियन क्रिकेट लीग स्पर्धेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ही स्पर्धा आयसीसीने अनधिकृत ठरविली होती. तर इंडियन प्रिमियर लीग, सीपीएल, नेटवेस्ट टी-२० या स्पर्धांना अनुक्रमे बीसीसीआय, ईसीबी व वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने मंजुरी दिली होती. त्यामुळे या स्पर्धांना मान्यता देण्यात आली. (वृत्तसंस्था)