शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वेटलिफ्टर संजीता चानूवरील तात्पुरते निलंबन हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 04:09 IST

आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक विजेती संजीता चानू हिच्यावर डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने लावलेले तात्पुरते निलंबन मागे घेतले आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक विजेती संजीता चानू हिच्यावर डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने लावलेले तात्पुरते निलंबन मागे घेतले आहे. वर्षभर चाललेल्या तपासात संजीताच्या नमुन्याच्या क्रमांकात हेराफेरी झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणी अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा आंतरराष्टÑीय महासंघाने केली.आयडब्ल्यूएफच्या वकील इवा निरफा यांनी संजीता आणि भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनला ई-मेल पाठविला. त्यात संजीतावर लावलेली अस्थायी बंदी २२ जानेवारी २०१९ पासून रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आयडब्ल्यूएफचे पॅनल लवकरच अंतिम निर्णय घेईल.गोल्डकोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत संजीताने ५३ किलो गटाचे सुवर्ण जिंकले होते. तिला स्टेराईड टेस्टोस्टेरोन सेवनात दोषी धरण्यात आले. त्यानंतर १५ मे रोजी अस्थायी बंदीची घोषणा करण्यात आली होती. आयडब्ल्यूएफने मागच्या वर्षी जुलैमध्ये स्वत:ची चूक कबूल केली होती. आपल्या अहवालात संजीताच्या नमुन्याचा चुकीचा क्रमांक दिल्याचे त्यांचे मत होते. संजीताला डोपिंगमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे सांगणाऱ्या ई-मेलमध्ये नमुन्याचे दोन वेगवेगळे क्रमांक पाठविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)>मी निष्पाप, आधीही डोपिंग केले नाही...‘‘ मला आंतरराष्टÑीय फेडरेशनचा मेल मिळाला. राष्टÑीय महासंघानेदेखील फोनवर माहिती दिली. मला दिलासा मिळाला आहे. मी निष्पाप आहे. करिअरमध्ये कधीही मी डोपिंग केले नाही. आंतरराष्टÑीय महासंघाच्या चुकीच्या पद्धतीमुळे मी नऊ महिन्यांपासून मानसिकदृष्ट्या दडपणात आहे. खेळाडूची प्रतिष्ठा फार मोलाची असते. माझ्यासोबत जे घडले ते कधी कुणाच्या वाट्याला येऊ नये. भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने आता राष्टÑीय शिबिरात सहभागी होण्यास सांगितले आहे. मी सहभागी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्व चॅम्पियनशिपला मी मुकले. यंदा मात्र विश्व चॅम्पियनशिपद्वारे आॅलिम्पिक २०२० साठी पात्रता मिळवू इच्छिते.’’ - संजीता चानू, वेटलिफ्टर.