शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टीम इंडियाचा ‘अश्वमेध’ सुसाट

By admin | Updated: February 14, 2017 00:19 IST

पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव

हैदराबाद : पाटा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी संयम दाखवित सोमवारी पाचव्या दिवशी संपलेल्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशचा २०८ धावांनी पराभव केला आणि १९ व्या कसोटी सामन्यापर्यंत अपराजित राहण्याचा पराक्रम नोंदविला. भारतीय कर्णधार विराट कोहलीला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.भारताने बांगलादेशपुढे विजयासाठी ४५९ धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव १००.३ षटकांत २५० धावांत संपुष्टात आला. भारताचा मायदेशातील यंदाच्या मोसमातील हा आठवा कसोटी विजय ठरला. भारताने एमकेव अनिर्णीत सामना राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग सहाव्या मालिकेत विजय मिळविला. २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध या मोहिमेची सुरुवात झाली होती. भारतीय संघ १९ कसोटी सामन्यांपासून अपराजित आहे. यापूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये गॉल येथे श्रीलंकेविरुद्ध भारताला अखेरचा पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)आयसीसी क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेला बांगलादेश संघ या लढतीत चार दिवस व दोन सत्र झुंज देईल, याचा कुणी विचार केला नव्हता. बांगलादेशने दोन्ही डावात एकूण २३० षटके फलंदाजी केली. बांगलादेशला पराभव टाळण्यासाठी अखेरच्या दोन सत्रांत ५८ षटके खेळायची होती; पण उपाहारानंतर ईशांतने चांगला स्पेल करताना पाहुण्या संघाच्या आशेवर पाणी फेरले. ईशांतने सुरुवातीला शब्बीर रहमानला (२२) पायचित केल्यानंतर महमुदुल्लाहला पूलचा फटका मारण्यास प्रवृत्त केले. महमुदुल्लाह फाईन लेग सीमारेषेवर तैनात असणाऱ्या भुवनेश्वरकडे झेल देत माघारी परतला आणि बांगलादेशचा पराभव निश्चित झाला. कर्णधार मुशफिकर रहीम (२३) चुकीचा फटका खेळून बाद झाला. महमुदुल्लाहसोबत त्याने पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.मेहदी हसन मिराजला (२३) जडेजाने माघारी परतविले. तैजुल इस्लामला (६) बाद करीत जडेजाने डावातील चौथा बळी घेतला. अश्विनने तास्किन अहमदला पायचित करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.भारतीय गोलंदाजही प्रशंसेस पात्र आहेत. खेळपट्टीकडून कुठल्याही प्रकारची मदत नसताना संयम दाखवित त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा गारद केले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३७ षटकांत ७८ धावांत ४, तर आर. अश्विनने ३०.३ षटकांत ७३ धावांत ४ बळी घेतले. ईशांत शर्माने १३ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना माघारी परतविले. भारतीय खेळाडूंनी विजयाचा जल्लोष न करता विजयाची आठवण म्हणून काही खेळाडूंनी बेल्स घेतल्या. विशेष म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशीही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती.धावफलकभारत प. डाव ६ बाद ६८७ (घोषित). बांगलादेश प. डाव ३८८. भारत दु. डाव ४ बाद १५९ (घोषित). बांगलादेश दुसरा डाव :- तामिम इक्बाल झे. कोहली गो. अश्विन ०३, सौम्या सरकार झे. रहाणे गो. जडेजा ४२, मोमिनुल हक झे. रहाणे गो. अश्विन २७, महमुदुल्लाह झे. भुवनेश्वर गो. ईशांत ६४, शाकिब-अल-हसन झे. पुजारा गो. जडेजा २२, मुशफिकर रहीम झे. जडेजा गो. अश्विन २३, शब्बीर रहमान पायचित गो. ईशांत २२, मेहदी हसन मिराज झे. साहा गो. जडेजा २३, कामरूल इस्लाम रब्बी नाबाद ०३, तैजुल इस्लाम झे. राहुल गो. जडेजा ०६, तास्किन अहमद पायचित गो. अश्विन ०१. अवांतर (१४). एकूण १००.३ षटकांत सर्वबाद २५०. बाद क्रम : १-११, २-७१, ३-७५, ४-१०६, ५-१६२, ६-२१३, ७-२२५, ८-२४२, ९-२४९, १०-२५०. गोलंदाजी : भुवनेश्वर ८-४-१५-०, अश्विन ३०.३-१०-७३-४, ईशांत १३-३-४०-२, उमेश १२-२-३३-०, जडेजा ३७-१५-७८-४.