शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ मजबूत

By admin | Updated: January 9, 2017 01:02 IST

स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील टीम आॅस्ट्रेलिया २३ फेब्रुवारीपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत विचार करीत आहे.

सिडनी : स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील टीम आॅस्ट्रेलिया २३ फेब्रुवारीपासून भारतात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत विचार करीत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ मजबूत असून त्यांना मायदेशात पराभूत करणे सोपे नाही, याची कल्पना आॅस्ट्रेलिया संघाला आहे. संघाचा कर्णधार दस्तूरखुद्द स्टीव्हन स्मिथने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आॅस्ट्रेलियाने अलीकडे मायदेशात पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला, पण कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियाविरुद्ध भारतात खेळण्याचे आव्हान सोपे नाही, असे स्मिथने म्हटले आहे. आॅस्ट्रेलियासाठी २०१३ चा भारत दौरा निराशाजनक ठरला. त्यावेळी त्यांना ०-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता. स्मिथ पुढे म्हणाला, ‘आमच्या संघातील काही खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. आॅस्ट्रेलिया आणि भारत येथील खेळपट्ट्यांमध्ये मोठा फरक असतो.’आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरन लीमन म्हणाले, ‘भारतात आॅस्ट्रेलियन फलंदाजांसाठी खेळपट्टीवर तळ ठोकणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड संघामध्ये त्याची उणीव भासली. इंग्लंडचा कर्णधार कुकनेही दौऱ्यानंतर याची कबुली दिली.’भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या संयोजनाबाबत विचारले असता प्रशिक्षकांनी खुलासा करण्याचे टाळले, पण अनुभवी सलामीवीर शॉन मार्शचा संघात समावेश होण्याचे संकेत मिळत आहेत. (वृत्तसंस्था)लीमन म्हणाले, ‘भारतात सर्वोत्तम संघ खेळविण्यात येईल. संघात हा खेळेलच हे आताच सांगणे कठीम आहे. परिस्थिती कशी राहील, त्यावर संघाची निवड अवलंबून राहील.’ भारतविरुद्ध पहिला कसोटी सामना पुणे येथे २३ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणार आहे. (वृत्तसंस्था)आम्ही सिडनी कसोटी सामन्यात १३५ षटके फलंदाजी केली. भारतात आम्हाला १५० पेक्षा अधिक षटके खेळपट्टीवर तळ ठोकून मोठी धावसंख्या उभारावी लागेल. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या संघापुढे हे मोठे आव्हान राहील. खेळाडू फिट असल्यामुळे त्यांनी खेळपट्टीवर अधिक वेळ राहयला हवे. -डॅरेन लीमन, प्रशिक्षकहा दौरा खडतर राहणार आहे. भारताविरुद्ध आम्हाला चमकदार कामगिरी करावी लागेल. आमच्या संघातील खेळाडूंना या दौऱ्याच्या निमित्ताने बरेच काही शिकण्याची संधी मिळणार आहे. २०१३ मध्ये भारत दौरा करणाऱ्या संघात स्मिथचा समावेश होता. दोन्ही देशातील खेळपट्ट्यांमध्ये मोठा फरक असतो. -स्टिव्हन स्मिथ, कर्णधार ...त्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल : डेव्हीड वॉर्नरफॉर्मात असलेल्या भारताला आगामी कसोटी मालिकेत पराभूत करण्यासाठी परिस्थितीसोबत जुळवून घेत चांगली फलंदाजी करावी लागेल आणि २० बळी घ्यावे लागतील, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली.आॅस्ट्रेलियाने अलीकडे कसोटी मालिकेत पाकिस्तानचा ३-० ने धुव्वा उडवला. या चमकदार कामगिरीमुळे आॅस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे, पण या संघाने आशियात सलग ९ कसोटी सामने गमावले आहेत. १९६० च्या दशकातील अखेरच्या वर्षांपासून त्यांना येथे केवळ एक मालिका जिंकता आली आहे. वॉर्नर म्हणाला,‘आम्हाला सकारात्मक विचार करावा लागेल. येथे प्रदीर्घ वेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सामना जिंकण्यासाठी २० बळी घेणे आवश्यक आहे. परिस्थितीसोबत लवकर जुळवून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी कुठली सबब देता येणार नाही. फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण या सर्वच विभागात छाप सोडणे आवश्यक आहे. एक योजना अपयशी ठरली तर दुसरी योजना तयार ठेवणे गरजेचे आहे.’आॅस्ट्रेलियासाठी हा दौरा सोपा नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मायदेशात गेल्या १८ कसोटी सामन्यांपासून अपराजित आहे. अलीकडेच भारताने इंग्लंडचा ४-० ने पराभव केला. त्यात दोन सामन्यांत डावाच्या फरकाने विजय मिळवला. वॉर्नर म्हणाला, आमचा संघ इंग्लंडच्या कामगिरीपासून प्रेरणा घेईल. इंग्लंडने पाचपैकी तीन कसोटी सामन्यांत चारशेपेक्षा अधिक धावा फटकावल्या.’