शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या तनिशाला कॅनडाचे तिकीट; बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 21:13 IST

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली तनिशा दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार

पणजी : सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेली गोव्याची अव्वल मानांकित तनिशा क्रास्तो हिची कॅनडा येथे होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलग तीन अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकल्यानंतर चंदिगड आणि पंचकुला या स्पर्धेतही तिने छाप सोडली आहे. त्यामुळे तनिशाने निवडकर्त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले. तनिशाने हे सत्र पूर्णपणे गाजवले. आता ती दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.नागपूर येथे ऐतिहासिक अशी दोन सुवर्णपदके पटकाविल्यानंतर गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्तो हिने आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली. हैदराबाद येथील अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतही तिने दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले होते. १५ वर्षीय तनिशाने आपली उत्तराखंडची जोडीदार आदिती भट्ट हिच्यासोबत खेळताना १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले होते. महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविणे आणि आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविणे हे माझे स्वप्न आहे. हा खूप मोठा प्रवास असेल याची मला कल्पना आहे; परंतु मी त्याच दृष्टिकोनाने तयारी करीत असल्याचे तिने म्हटले आहे.दरम्यान, तनिशाच्या या निवडीचे गोवा बॅडमिंटन संघटनेकडून अभिनंदन करण्यात आले आहे. संघटनेचे सचिव संदीप हेबळे म्हणाले की, तनिशा सध्या म्यानमार येथे सुरू असलेल्या ज्युनियर आशियाई स्पर्धेत खेळत आहे. ही संधी मिळते न मिळते तोच तिने कॅनडा येथे नोव्हेंबरमध्ये होणाºया स्पर्धेतही स्थान मिळविले आहे. चंदिगड येथील स्पर्धेत तिने सलग तिसरे सुवर्ण आणि मिश्रदुहेरीत पदके मिळविली आहेत. गोवा बॅडमिंटन संघटनेची एक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत असल्याने आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या पालकांचे, प्रशिक्षकांचे आणि सपोर्ट टीमचे आम्ही अभिनंदन करतो.