शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तामिळनाडू -विदर्भ सामना

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

शंकरची शतकी खेळी, तामिळनाडू दमदार मजल

शंकरची शतकी खेळी, तामिळनाडू दमदार मजल
रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरी : विदर्भ बिनबाद ९
नागपूर : विजय शंकरची (१११) शतकी खेळी व बाबा अपराजितने (९७) झळकाविलेल्या अर्धशतकाच्या जोरावर तामिळनाडूने विदर्भाविरुद्ध रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने दिवसअखेर बिनबाद ९ धावा केल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत आजचा खेळ थांबला त्यावेळी ७ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या फैज फझल याला सचिन कटारिया (१) साथ देत होता.
त्याआधी, कालच्या ४ बाद २३४ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची दमदार मजल मारली. शंकरने शतकी खेळी करीत धावसंख्येला आकार दिला. सोमवारी नाबाद असलेला फलंदाज आर. प्रसन्ना (२२) दुसऱ्या दिवशी सर्वप्रथम बाद झाला. शतकी खेळी केल्यानंतर शंकरही माघारी परतला. शंकरने ३०५ चेंडूंना सामोरे जाताना १११ धावा फटकाविल्या. त्यात १३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. इंदरजितने त्यानंतर रंगराजनसोबत (२७) सातव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली आणि संघाला साडेतीनशेचा पल्ला ओलांडून दिला. एका टोकाकडून फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या टोकाकडून इंदरजितने संयमी फलंदाजी केली. तामिळनाडूच्या डावात बाद होणार तो अखेरचा फलंदाज ठरला. त्याचे शतक तीन धावांनी हुकले. त्याने २३६ चेंडूंना सामोरे जाताना ९७ धावा फटकाविल्या. त्यात १० चौकारांचा समावेश आहे. विदर्भातर्फे राकेश ध्रुवने १०६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर श्रीकांत वाघ व आर.डी. ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)