शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग केल्याप्रकरणी जलतरण प्रशिक्षक सुरजीत गांगुलीला दिल्लीत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:31 IST

संशयित गांगुली तसेच पीडिता मूळ पश्चिम बंगाल येथील आहेत. गांगुली हा मागील काही वर्षांपासून म्हापसा शहरातील पेडे येथे जलतरणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. तर पीडित मुलगी गांगुलीकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्यात आली होती.

म्हापसा : पश्चिम बंगाल येथील १५ वर्षीय अल्पवयीन जलतरणपटूचा विनयभंग केल्याप्रकरणी जलतरण प्रशिक्षक सुरजीत गांगुलीला पोलिसांनी दिल्लीतील काश्मिरा गेट परिसरात शुक्रवारी अटक केली. त्याच्या विरोधात उत्तर गोव्यातील म्हापसा पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविला आहे. पीडितेच्या वडिलांनी ही तक्रार पश्चिम बंगाल पोलिसांकडे केली होती. मात्र, संबंधितांनी हा गुन्हा नोंदवून न घेता थेट गोवा पोलिसांना पाठवून दिला. त्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना ई-मेलद्वारे ही तक्रार आली होती. म्हापसा पोलिसांनी संशयित प्रशिक्षक गांगुलीविरुद्ध भादंसंच्या कलम ३७६ (बलात्कार), ३५४ (विनयभंग) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) तसेच गोवा बाल कायदा व पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. गांगुलीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार केली होती. यातील एक दिल्ली, दुसरे भोपाळ तर तिसरी बंगळुरू येथे पाठविले होते. विनयभंगाचा हा प्रकार १४ मार्च ते २८ ऑगस्ट २०१९ दरम्यान घडला असावा. या कालावधीतच पीडितेने हा व्हिडीओ बनविला असावा, असा अंदाज म्हापसा पोलिसांकडून लावला जात आहे. गुरुवारी हा व्हिडीओ समाजमाध्यमातून सर्वदूर गेला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. संशयित गांगुली तसेच पीडिता मूळ पश्चिम बंगाल येथील आहेत. गांगुली हा मागील काही वर्षांपासून म्हापसा शहरातील पेडे येथे जलतरणाचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. तर पीडित मुलगी गांगुलीकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गोव्यात आली होती. आपल्या आईवडिलांसमवेत म्हापसा येथे भाड्याच्या घरात राहायची. तिच्या पालकांनी पेडे-म्हापसा येथील जलतरणाच्या प्रशिक्षणासाठी भरती केले होते. संशयित सुरजीत गांगुली हा तिचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली पीडितेने राष्ट्रीय स्तरावर चांगल्या कामगिरीचे प्रदर्शनही केले होते. पीडितेचे आईवडील नसताना संशयित गांगुली याची तिच्या घरी ये-जा होती. त्याच्याकडून होत असलेला छळाचा प्रकार पीडितेने पालकांच्या कानीसुद्धा घातला होता. त्यानंतर तिने स्वत: या प्रकाराचे चित्रीकरण केले होते.

टॅग्स :Swimmingपोहणेgoaगोवाdelhiदिल्ली