शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात खुल्या समुद्रामध्ये रंगणार स्विमॅथॉनचा थरार, वीरधवल खाडे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 22:39 IST

अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणा-या स्विमॅथॉन २०१७ स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे याचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली.

मुंबई : अथांग समुद्राशी स्पर्धा करण्यासाठी नवोदित आणि हौशी जलतरणपटूंना संधी देणा-या स्विमॅथॉन २०१७ स्पर्धेची सोमवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी भारताचा अव्वल जलतरणपटू आॅलिम्पियन वीरधवल खाडे याचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली.यंदाचे सहावे वर्ष असलेल्या या स्पर्धेची रंगत गोव्यातील कोलवा समुद्रकिनारी ३ डिसेंबरला रंगले. दखल घेण्याची बाब म्हणजे खुल्या समुद्रामध्ये होत असलेल्या या आव्हानात्मक स्पर्धेसाठी विशेष त्रिकोणीय मार्गिका तयार करण्यात येणार असून असा प्रयोग पहिल्यांदाच देशात होत असल्याची माहिती, स्पर्धा आयोजकांनी दिली. स्विमिंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या (एसएफआय) मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेकडे राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा म्हणूनही पाहिले जाणार आहे. त्यामुळे, स्पर्धक जलतरणपटूंमध्ये मोठी स्पर्धा यावेळी पाहण्यास मिळेल.पुरुष व महिला गटात होणाºया या स्पर्धेत पुरुषांची शर्यत १० किमी, तर महिलांची शर्यत ५ किमी अंतराची होईल. त्याचवेळी, या स्पर्धेतील विजेते खेळाडू आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याने जेतेपदासाठी सर्वांपुढे कठिण आव्हान असेल. शिवाय आगामी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही सहभागी होण्याची संधी या स्पर्धेतून खेळाडूंना मिळेल.गेल्यावर्षी या स्पर्धेत सुमारे ६०० जलतरणपटूंचा सहभाग लाभला होता, तर यंदा हीच संख्या हजारच्यापुढे जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. १० किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्या पुरुष - महिला जलतरणपटूंना प्रत्येकी ५० हजार, तर ५ किमी अंतराच्या शर्यतीतील विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जिंकण्याची संधी असेल. तसेच, खुल्या जलतरण क्रीडा प्रकाराच्या प्रसारासाठी आणि नवोदितांना अधिक आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेत एक किमी आणि २.५ किमी अंतराची विशेष शर्यतही आयोजित करण्यात येणार आहे.नुकताच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत माझी कामगिरी खूप चांगली झाली. त्यातून मिळालेला आत्मविश्वास मला आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खूप फायदेशीर ठरेल. शिवाय आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी मी कसून तयारी करत असून यासाठी मी सरकारकडे कोल्हापूरहून मुंबईत बदली करुन घेण्याची विनंती केली होती आणि माझी विनंती त्यांनी लगेच मान्यही केली. खुल्या समुद्रात पोहणे नक्कीच आव्हानात्मक असेल. त्यासाठी सर्वच जलतरणपटूंना कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे हौशी जलतरणपटूंना ही स्पर्धा एक सुवर्णसंधी असेल.- वीरधवल खाडे, जलतरणपटू.

टॅग्स :Sportsक्रीडा