नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता स्टार मल्ल सुशील कुमार याने खांद्याच्या जखमेमुळे ७ ते १२ डिसेंबर या कालावधीत अमेरिकेतील लास वेगास येथे आयोजित विश्व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतून माघार घेतली. सरावादरम्यान त्याला गेल्या काही दिवसांपासून उजवा खांदा दुखत असल्याने त्याने माघारीचा निर्णय घेतला.लास वेगास येथे होणारी विश्व चॅम्पियनशिप रियो आॅलिम्किकसाठी पहिली पात्रता चाचणी असेल. विश्व चॅम्पियननंतर पात्रता गाठण्यासाठी यानंतर आणखी सहा चाचण्या व्हायच्या आहेत. ३२ वर्षांच्या सुशीलला रियो आॅलिम्पिकआधी पात्रता फेरी गाठायची असल्याने पुढील वर्षीपर्यंत तो आणखी स्पर्धा खेळणार नाही. सुशीलने २०१० च्या मॉस्को विश्वचषक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. अशी कमगिरी करणारा तो पहिलाच मल्ल आहे. सुशीलने २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्य आणि २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकचे रौप्य पदक जिंकले आहे. २०१६ च्या रियो आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या इराद्याने उतरण्याचा सुशीलचा मनोदय आहे. (वृत्तसंस्था)खांद्याला दुखापत आहे आणि मी सराव करीत असताना जास्त त्रास जाणवायला लागला होता. बरा होऊन लवकरात लकवर आखाड्यात सराव करू इच्छितो. माझे लक्ष आॅलिम्पिकवर असल्याने रियो आॅलिम्पिकसाठी मी स्वत:ला सज्ज करीत आहे. -सुशीलकुमार
विश्व कुस्ती स्पर्धेतून सुशीलकुमारची माघार
By admin | Updated: July 3, 2015 04:33 IST