शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

सुरेश रैनाचे न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी वनडे संघात पुनरागमन

By admin | Updated: October 6, 2016 21:02 IST

मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने १६ आॅक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि.06 -  मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने १६ आॅक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले आहे, तर हरियाणाचा आॅफस्पिनर जयंत यादव जाहीर झालेल्या भारतीय संघात एकमेव नवा चेहरा आहे. महाराष्ट्राचा शैलीदार फलंदाज केदार जाधव याचादेखील संघात समावेश करण्यात आला आहे.सुरेश रैनाला झिम्बाब्वेविरुद्ध जून महिन्यात वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्याचे पुनरागमन झाले आहे, तर आॅफ स्पिनर आर. आश्विन, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे.निवड समितीचे नवे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी येथे झालेल्या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. जाहीर झालेल्या संघात महाराष्ट्राच्या केदार जाधवसह जसप्रीत बुमराह, फलंदाज मनदीपसिंह यांचादेखील समावेश करण्यात आला.महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघात फलंदाज मनीष पांडे याने आपली जागा सुरक्षित ठेवली आहे, तर वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे पुनरागमन झाले आहे. तो झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला नव्हता; परंतु देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी करून कसोटी संघात स्थान मिळवणाऱ्या गौतम गंभीर याला मात्र वनडे संघात स्थान मिळू शकले नाही. गंभीरच्या नावाचादेखील विचार झाला होता असे प्रसाद यांनी सांगितले. ते म्हणाले, ह्यआम्ही मनदीपला सलामीवीर फलंदाजाच्या रूपात तयार करीत आहोत. त्याने आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध त््यांच्याच भूमीत खूप चांगली कामगिरी केली होती.ह्ण भारताचे देशांतर्गत प्रदीर्घ सत्र पाहता आश्विन, शमी, जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. हे तिन्ही खेळाडू कसोटी संघातील नियमित सदस्य आहेत. भारताला या हंगामात एकूण १३ कसोटी सामने खेळायचे आहेत.आॅफस्पिनर यादवने आतापर्यंत ४२ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर ११७ विकेटस् आहेत. सात तज्ज्ञ फलंदाजांत विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. धोनीच्या संघात एकमेव यष्टिरक्षक आहे. वेगवान गोलंदाजीची मदार उमेश यादव, बुमराह, धवल कुलकर्णी यांच्या खांद्यावर असेल, तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडतील. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी लेगस्पिनर अमित मिश्रा याच्या खांद्यावर असेल. त्याला अक्षर पटेलची साथ मिळेल.मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे १६ आॅक्टोबर रोजी खेळवला जाईल. त्यानंतरचा सामना दिल्ली (२0 आॅक्टोबर), मोहाली (२३ आॅक्टोबर), रांची (२६ आॅक्टोबर) आणि विशाखापट्टणम (२९ आॅक्टोबर) येथे होईल.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे :महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीप सिंह आणि केदार जाधव.