शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

‘सुपरफास्ट’ सात्त्विक साईराज गिनीज बुकमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 05:52 IST

सर्वांत वेगवान हिटचा नोंदवला विश्वविक्रम

सोका (जपान) : भारताचा स्टार शटलर सात्त्विक साईराज रंकीरेड्डी याने तब्बल ५६५ किमी प्रतिताशी तुफानी वेगाचा स्मॅश नोंदवला. यासह तो सर्वात वेगाने फटका मारणारा पुरुष बॅडमिंटनपटू ठरला. सात्त्विक साईराजच्या या विश्वविक्रमाची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली आहे. 

जूनमध्ये झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेत सात्त्विकने चिराग शेट्टीसह खेळताना पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. त्याने मलेशियाच्या टेन बून हियोंग याचा सुमारे एक दशकाहून जुना असलेला विश्वविक्रमही मोडला. होयोंगने ४९३ प्रतितास इतक्या वेगाने स्मॅश मारला होता. सात्त्विकच्या स्मॅशचा वेग एका फॉर्म्युला कारने गाठलेल्या ३७२.६ किमी प्रतितास वेगाहूनही अधिक होता. 

महिलांमध्ये सर्वात वेगवान स्मॅशचा विश्वविक्रम मलेशियाच्या टेन पियर्लीच्या नावावर आहे. पियर्लीने ४३८ किमी प्रतितास इतक्या वेगाने स्मॅश मारला आहे. सात्त्विकने हा विश्वविक्रम १४ एप्रिल २०२३ रोजी नोंदवला होता आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत परीक्षकांनी त्या दिवशी नोंदवलेल्या वेगाच्या आधारे या विश्वविक्रमाची निश्चिती केली. सात्त्विकने हा स्मॅश जपानमध्ये सोका येथील एका आघाडीच्या क्रीडा साहित्य कंपनीच्या जिममध्ये मारला होता.

सात्त्विक - चिराग दुसऱ्या फेरीतयेओसू (कोरिया) : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या भारताच्या स्टार पुरुष जोडीने मंगळवारी येथे कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. सलामी लढतीत भारतीय जोडीने थायलंडचे जोमकोह-केद्रेन या जोडीवर २१-१६, २१-१४ ने मात केली.  जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेले सात्त्विक- चिराग यांना पुढील फेरीत चीनचे ही जी टिंग - झोउ हाओ डोंग यांच्याविरुद्ध खेळावे लागेल. एमआर अर्जुन- ध्रुव कपिला या २७ व्या स्थानावरील भारतीय जोडीला अर्जुनच्या पाठदुखीमुळे माघार घ्यावी लागली. पाठदुखी सुरू होण्याआधी भारतीय खेळाडू पहिल्या गेममध्ये  ५-६ ने माघारले होते.

टॅग्स :BadmintonBadminton