शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

सुनील गावसकर, शास्त्री, श्रीकांत, गांगुलीने व्यावसायिक हित जोपासले

By admin | Updated: December 18, 2014 05:15 IST

बीसीसीआयमध्ये व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री, निवड समितीचे माजी

नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये व्यावसायिक हित जोपासणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री, निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासह माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचा समावेश आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बीसीसीआयने बुधवारी काही प्रशासक आणि संचालकांची यादी सादर केली.अनेक आठवडे चाललेली मॅरेथॉन सुनावणी संपल्यानंतर कोर्टाने बीसीसीआयमध्ये पुनरागमनाचे वेध लागलेले एन. श्रीनिवासन यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास तसेच चेन्नई सुपरकिंग्सच्या खरेदीवरून उद्भवलेल्या दुटप्पी भूमिकेबाबतचा निर्णय राखून ठेवला. विशेष खंडपीठाने श्रीनवासन यांच्या बोर्डाचे प्रमुख आणि सीएसकेचे मालक या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सुनावणी करणारे न्या. टी. एस. ठाकूर आणि न्या. एफएमआय कलिफुल्ला यांच्या खंडपीठाच्या निर्देशानुसार आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये व्यावसायिक हितसंबंध असलेल्या संचालक आणि प्रशासकांची यादी आज बीसीसीआयने सादर केली. या यादीत उपरोक्त नावांसह लालचंद राजपूत यांचाही समावेश आहे. यादी वाचल्यानंतर न्यायालयाने ताशेरे ओढताना म्हटले की श्रीकांत राष्ट्रीय निवडकर्ते आहेत आणि हैदराबाद सनराईजर्सचे मेंटॉर देखील. हे कसे काय शक्य आहे? विशेष असे की भ्रष्टाचारप्रकरणी अस्थायी निलंबनानंतर श्रीनिवासन यांच्याऐवजी श्रीकांत हेच आयपीएल २०१४ चे संचालन करीत होते. बीसीसीआयने २००८ साली आपल्या संविधानातील ६.२.४ या नियमांत दुरुस्ती केली. त्यानुसार बीसीसीआयचे अधिकारी आणि प्रशासकांना आयपीएल तसेच चॅम्पियन्स लीगमधील संघ खरेदी व प्रायोजकत्वाचे अधिकार बहाल करण्यात आले होते. याच वादग्रस्त संशोधनामुळे क्रिकेटमध्ये पैशाचा ओघ वाढलाच शिवाय अफरातफरीला पळवाटा फुटू लागल्याचे अनेक क्रिकेट प्रशासकांचे मत आहे.(वृत्तसंस्था)