शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

सुधा सिंगला सुवर्णपदक

By admin | Updated: July 9, 2017 02:57 IST

येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने

भुवनेश्वर : येथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुधाने ९ मिनिट ५९.४७ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. सुधाने २00९, २0११ आणि २0१३ च्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानले होते. परंतु यंदाच्या स्पर्धेत नुकतीच विवाहबध्द झालेल्या महाराष्ट्र कन्या ललिता बाबरने माघार घेतल्याने तिला सुवर्णपदकाची संधी होती. याशिवाय बहारिनची विश्व आणि आशियाई विक्रमवीर रुथ जेबेट हीचे आव्हानही या स्पर्धेत नसल्याने सुधाचा सुवर्णपदकाचा मार्ग सोपा झाला होता.३१ वर्षीय सुधाने सुरवातीपासूनच आघाडी घेतली होती. सर्वांसोबत काही वेळ पळाल्यानंतर सुधा पाच स्पर्धकांसह शर्यतीत पुढे होती. शर्यत निम्म्यावर आल्यानंतर सुधाने आपला वेग वाढवत सर्वांना मागे टाकले आणि निर्णायक आघाडी घेतली. सुवर्णपदकाला गवसणी घातल्यानंतर तिने मैदानाला फेरी मारुन प्रेक्षकांना अभिवादन केले. उत्तर कोरियाची १८ वर्षीय हयो गयोंग १0 मिनिट १३.९४ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदकावर कब्जा केला. १0 मिनिटे १८.११ सेकंदाची वेळ नोंदवणाऱ्या जपानच्या नाना सातो हिला कांस्यपदक मिळाले.(वृत्तसंस्था)रिओ आॅलिम्पिकनंतर ही माझी पहिली मोठी स्पर्धा होती. मला स्वाईन फ्ल्यू झाल्यानंतर ५ महिने माझा सराव बंद होता. त्यामुळे आजचे पदक महत्त्वाचे आहे. आज नोंदवलेली वेळ थोडी जास्त असली तरी येथील परिस्थिती थोडी प्रतिकूल होती. या विजयाने वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी पात्रता मिळाल्याने मी जास्त खूष आहे.- सुधा सिंग.पुरुषांच्या १00 मी. धावण्याच्या स्पर्धेत वादावादीयेथे सुरु असलेल्या २२ व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत खराब सुरवातीवरुन वादावादी झाली. या स्पर्धेत मलेशियाच्या खेरुल हाफिज या खेळाडूला अपात्र ठरवण्यात आले होेते. हाफीजने शर्यत पुन्हा घेण्याची मागणी केली परंतु ती फेटाळून लावण्यात आली.मैदानावर उपस्थित तांत्रिक समितीने धावपटूंच्या सुरवातीचे प्रिंटआउट पाहिल्यानंतर कतारच्या तोसिन जोसेफ ओनुगोडे याला अपात्र ठरवले. चीनच्या टँग शिगकियांग यालाही खराब सुरवातीच्या कारणावरुन अपात्र ठरवण्यात आले.