शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची मजबूत पकड

By admin | Updated: November 18, 2015 02:11 IST

सौरभ वाकसकर (नाबाद १६१) याने झळकावलेले शानदार दीडशतक आणि व्ही. चेलुवराज (नाबाद ७०) याची अर्धशतकी खेळी या जोरावर रेल्वे संघाने रणजी ट्रॉफी सामन्यात बलाढ्य मुंबईविरुद्ध

मुंबई : सौरभ वाकसकर (नाबाद १६१) याने झळकावलेले शानदार दीडशतक आणि व्ही. चेलुवराज (नाबाद ७०) याची अर्धशतकी खेळी या जोरावर रेल्वे संघाने रणजी ट्रॉफी सामन्यात बलाढ्य मुंबईविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेर मजबूत पकड घेतली. रेल्वेने आपल्या दुसऱ्या डावात मजबूत खेळी करताना केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात २८५ धावांची मजल मारत मुंबईविरुद्ध १७१ धावांची दमदार आघाडी घेतली आहे.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘ब’ गटातील या सामन्यात यजमानांनी तिसऱ्या दिवशी ९ बाद ३३० धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. या वेळी सर्वांना उत्सुकता होती ती निखिल पाटीलच्या शतकाची. मात्र विशाल दाभोळकर पहिल्याच षटकात बाद झाल्याने निखिल ८३ धावांवर नाबाद राहिला. मुंबईने केवळ एका धावाची भर टाकून ३३१ धावांची मजल मारत रेल्वेविरुद्ध पहिल्या डावात ११४ धावांची आघाडी घेतली. कर्ण शर्माने दाभोळकरला बाद करून पहिल्या डावात ७ बळी घेण्याचा पराक्रम केला. यानंतर शतकी अघाडीचे ओझे घेऊन फलंदाजीला उतरलेल्या रेल्वेच्या वाकसकर - आशिष सिंग या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. मुंबईकर गोलंदाजीचा धैर्याने सामना करताना त्यांनी संघाला शतकी सलामी दिली. फिरकी गोलंदाज दाभोळकरने आशिषला पायचीत पकडून रेल्वेला १०५ धावांवर पहिला धक्का दिला. या वेळी मुंबई पकड मिळवणार अशी शक्यता होती. मात्र चेलुवराजने वाकसकरच्या साथीने दिवसअखेर टिकून राहत मुंबईकरांना दमवले. (क्रीडा प्रतिनिधी)वाकसकर - चेलुवराज यांनी दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १८० धावांची भागीदारी केली. वाकसकरने २६० चेंडंूत १५ चौकार व २ षटकारांसह नाबाद १६१ धावांची शानदार खेळी केली असून, चेलुवराजने त्याला मोलाची साथ देताना १६७ धावांत ६ चौकारांसह ७० धावांची संयमी अर्धशतकी खेळी खेळली. सामन्याच्या अखेरच्या दिवशी रेल्वेचे झटपट बळी घेत सामन्यात पुनरागमनाचे यजमानांचे प्रयत्न असतील. मात्र एकूण चित्र पाहता सामना अनिर्णीत राहण्याची चिन्हे दिसत आहेत. धावफलक :रेल्वे (पहिला डाव) : ८४.४ षटकांत सर्वबाद २१७ धावा.मुंबई (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. नंदी गो. शर्मा १४५, जय बिस्त झे. मिश्रा गो. अनुरीत सिंग २, धवल कुलकर्णी त्रि. गो. शर्मा ०, श्रेयश अय्यर झे. रावत गो. शर्मा ५७, सूर्यकुमार यादव झे. मिश्रा गो. नंदी ७, आदित्य तरे झे. घोष गो. शर्मा ०, सिद्धेश लाड पायचीत गो. शर्मा ५, निखिल पाटील नाबाद ८३, शार्दुल ठाकूर झे. चेलुवराज गो. शर्मा ९, हरमीत सिंग धावबाद (फैझ अहमद) २०, विशाल दाभोळकर पायचीत गो. दाभोळकर ०. अवांतर - ३. एकूण : ९५.४ षटकांत सर्वबाद ३३१ धावा.गोलंदाजी : अनुरीत सिंग २७-६-९५-१; कर्ण शर्मा ३१.४-३-९१-७; अर्णब नंदी २१-१-७६-१; अक्षत पांड्ये १३-१-५३-०; एस.एस. मिश्रा ३-०-१४-०.रेल्वे (दुसरा डाव) : सौरभ वाकसकर खेळत आहे १६१, आशिष सिंग पायचीत गो. दाभोळकर ४४, व्ही. चेलुवराज खेळत आहे ७०. अवांतर - १०. एकूण : ८६ षटकांत १ बाद २८५ धावा.गोलंदाजी : धवल कुलकर्णी १७-६-३८-०; शार्दुल ठाकूर १५-५-३७-०; विशाल दाभोळकर १९-१-८१-१; जय बिस्त १५-२-४९-०; हरमीत सिंग १२-०-४०-०; सिद्धेश लाड ४-०-२०-०; श्रेयश अय्यर ४-१-११-०.