शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

स्टीव्ह स्मिथकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व

By admin | Updated: December 16, 2014 01:24 IST

जखमी मायकेल क्लार्कच्या भविष्याबाबत शंका व्यक्त केली जात असताना स्टीव्ह स्मिथ याला उर्वरित मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार नेमण्यात आले आहे.

मेलबोर्न : जखमी मायकेल क्लार्कच्या भविष्याबाबत शंका व्यक्त केली जात असताना स्टीव्ह स्मिथ याला उर्वरित मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा कर्णधार नेमण्यात आले आहे. सीएने सोमवारी या आशयाची घोषणा केली. अ‍ॅडिलेड कसोटीत स्नायू ताणले गेल्याने बाहेर पडलेल्या क्लार्कऐवजी स्मिथकडे नेतृत्व सोपविण्यात आले. ब्रॅड हॅडिन उपकर्णधार असेल. सीएचे निवडकर्ते रॉड मार्श यांनी स्टीव्हला आंतरराष्ट्रीय कसोटी कर्णधारपद मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.मार्श पुढे म्हणाले, ‘निवडकर्ते स्मिथला पसंती दर्शवितात. त्याची कामगिरी, परिपक्वता आणि नेतृत्व क्षमता या कामात त्याच्यावर भरवसा दाखविता येतो. २५ वर्षांचा स्मिथ आॅस्ट्रेलियाचा सर्वांत युवा कर्णधार बनला. त्याआधी १९७९ साली किम ह्यूज हा २५ व्या वर्र्षी कसोटी संघाचा कर्णधार बनला होता. आॅस्ट्रेलियाचा तो ४५वा, तर एकंदरीत तिसरा युवा कर्णधार ठरला. स्मिथ याला याआधी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्याने केवळ न्यू साऊथ वेल्सचे नेतृत्व केले आहे. तो भारताविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत नेतृत्व करेल. कर्णधारपदाच्या शर्यतीत स्मिथसोबत ३७ वर्षांचा ब्रॅड हॅडिन हा देखील दावेदार होता; पण अधिक वय असल्याने निवडकर्ऱ्यांनी त्याला उपकर्णधारपद बहाल केले. अ‍ॅडिलेड सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या स्मिथने नेतृत्वाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, ‘अन्य सहकारी आणि हॅडिनकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. गेली १८ महिने माझ्यासाठी आणि संघासाठी अत्यंत कठीण होते. कर्णधारपदाचे स्वप्न मी नेहमीच पाहिले. आता ही संधी मिळाली आहे. अनुभवी आणि युवा लोकांचे नेतृत्व करताना मला त्रास जाणवणार नाही. मी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वांसोबत खेळलो आहे. सध्याच्या संघातील अनुभवी खेळाडूंचे मला सहकार्य मिळेल, अशी आशा आहे.’ स्मिथने २०१० साली पाकविरुद्ध कसोटी पदार्पण केले. (वृत्तसंस्था)