शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय खो खो : रा. फ. नाईक, शिवभक्त, छत्रपती, आर्यन-रत्नागिरी उपांत्यफेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 15:15 IST

महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या  रा. फ. नाईक विद्यालय या संघाने विजय मिळवला.

मुंबई : महिला राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत ठाण्याच्या  रा. फ. नाईक विद्यालय या संघाने साखरवाडी क्रीडा मंडळ सातारा या संघाचा १७-०५ असा बारा गुणाने पराभव केला.  रा. फ. नाईक कडून खेळताना रुपाली बडेने १:५०, ३:१० मिनिटे संरक्षण करताना दोन खेळाडू मिळवले. पौर्णिमा सकपाळने ३:१० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात तीन  गडी  मिळवले, तर साक्षी तोरणे व पूजा फरगडे यांनी आक्रमणात प्रत्येकी तीन खेळाडू बाद केले. साखरवाडी क्रीडा मंडळच्या प्रांजल माडकरने २:५०, ३:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक गडी बाद केला मुस्कान नगारजी हिने १:०० , १:२० मिनिटे संरक्षण करत चांगली साथ दिली. 

शिवभक्त विद्यालय, ठाणे या संघाने नरसिंह क्रीडा मंडळ पुणे या संघाचा १०-०८ असा एक डाव  व दोन  गुणांनी पराभव केला.  शिवभक्त विद्यालय, ठाण्याच्या  किशोरी मोकाशीने २:००, २:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक खेळाडू बाद केला व  प्रियांका भोपीने  नाबाद ३:३० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले,  तर कविता घाणेकरने ३:३० मिनिटे संरक्षण केले.  नरसिंह क्रीडा मंडळतर्फे श्वेता वाघ नाबाद १:२० मिनिटे संरक्षण केले  व  आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. प्रांजल जाधवने १:३०  मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात एक खेळाडू बाद करत  चांगली लढत दिली.

छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ उस्मानाबाद संघाने श्री  समर्थ व्यायाम मंदिर दादर या संघाचा ११-०६ असा एक डाव  व पाच गुणांनी  राखून  पराभव केला.  उस्मानाबाद कडून खेळताना निकिता पवारने २:३०, १:३० मिनिटे नाबाद  संरक्षण करत आक्रमणात चार खेळाडू बाद केले व जान्हवी पेठेने  ४:००  संरक्षण केले. स्नेहा गोडसेने आक्रमणात दोन खेळाडू बाद केले, तर  श्री  समर्थकडून भक्ती धांगडेने १:२० , १:२० मिनिटे संरक्षण करत आक्रमणात तीन खेळाडू बाद केले. साजल पाटीलने  २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात एक खेळाडू बाद केले. 

रत्नागिरीच्या आर्यन स्पोर्ट्स क्लबने परांजपे स्पोर्ट्स क्लब या  संघाचा ०९-०५ असा एक डाव व चार गुणाने पराभव केला. आर्यन स्पोर्ट्स क्लबकडून तन्वी कांबळेने ३:२० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात एक खेळाडू बाद केला.  ऐश्वर्या सावंतने ५:४० मिनिटे संरक्षण केले. सोनिया भोसलेने आक्रमणात पाच खेळाडू बाद केले.  परांजपे स्पोर्ट्स क्लबकडून श्रुती सकपाळने  १:२० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन खेळाडू मिळवले. आरती कदमने  १:२० मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात दोन खेळाडू बाद चांगला खेळ केला. 

व्यावसायिक स्पर्धेत विदयुत महावितरण कंपनी या संघाने चिट चॅट कम्युनिकेशन या संघाचा २०-१ असा दहा गुणाने पराभव केला. विदयुत महावितरण कंपनीकडून प्रतीक वाईकरने २:२०, २:०० मिनिटे  संरक्षण केले व आक्रमणात दोन  गडी बाद केले. तर गजानन शेंगाळने २:०० मिनिटे संरक्षण केले व आक्रमणात तीन गडी मिळवले, तर नरेश सावंतने २:३० नाबाद , १:१०  आक्रमणात एक गडी मिळवले. 

टॅग्स :Kho-Khoखो-खो