शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : गोलफादेवी ठरले "उजाला चषकाचे" मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 20:21 IST

सिद्धेश पिंगळे स्पर्धेत सर्वोत्तम

मुंबई :  मुंबई शहरच्या गोलफादेवी संघाने बंड्या मारुतीचा ३४-२९असा पराभव करीत रोख रु.५१,०००/- व "उजाला चषक" आपल्या नावे केले. उपविजेत्या बंड्या मारुतीला रोख रु.३५,००/- व चषकावर समाधान मानावे लागले. गोलफादेवीचा सिद्धेश पिंगळे ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. त्याला " मोटरबाईक" देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व ठाणे जिल्हा कबड्डी असो. यांच्या मान्यतेने उजाला क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील हा अंतिम सामना मुंबईतील या दोन संघात रंगला.

पहिला गुण घेत गोलफादेवीने सुरुवात झोकात केली. पहिला लोण देत त्यांनी विजयाच्या दिशेने मुसंडी मारली.मध्यांतराला गोलफादेवीने २०-१० आघाडी घेत सामन्यावरील आपली पकड अधिक भक्कम केली. मध्यांतरानंतर बंड्या मारुतीच्या विनोद अत्याळकर व शुभम चौगुले यांनी आपल्या खेळाची गती वाढवीत सामन्यात रंगत आणली. काही झटापटीच्या क्षणामुळे सामन्यातील चुरस वाढली. पण वेळीच सावरत गोलफादेवीने विजय आपल्या हातून निसटू दिला नाही. सिद्धेश पिंगळे, तुषार दुडिया यांच्या चतुरस्त्र खेळाला गोलफादेवीच्या विजयाचे श्रेय जाते. 

बंड्या मारुतीचा विनोद अत्याळकर आणि गोलफादेवीचा तुषार दुडिया यांना स्पर्धेतील अनुक्रमे चढाई आणि पकडीचे सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. दोघांना प्रत्येकी सायकल देऊन गौरविण्यात आले. या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गोलफादेवीने जय शिवचा ३८-१७ असा, तर बंड्या मारुतीने श्रीरामचा ४१-१७ असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या उपांत्य उपविजयी दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रु.१५,०००/- व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार कपिल पाटील, भिवंडी पूर्वचे आमदार रुपेश म्हात्रे, कल्याण पूर्वचे  आमदार गणपत गायकवाड,  जिल्हापरिषद सदस्य जयंत पाटील, भाजपाचे देवेश पाटील, स्पर्धा निरिक्षक शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई