शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कबड्डी : सुवर्णयुग व शिवशक्ती संघांचा अतिम फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:20 IST

महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या राजा शिवछत्रपती संघावर 33-21 असा विजय मिळवित अंतिम सामन्यात प्रवेश केला.

ठळक मुद्देमुंबईच्या रेखा सावंत व ज्योती उफाळे यांनी आपल्या नावलौकीका प्रमाणे खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले.

कोथरुड(पुणे)- पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॅडवरील कोथरुड येथील जीत मैदानावर सुरू असलेल्या पुरूष व महिला खुले गट महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला विभागात पुण्याच्या सुवर्णयुग व मुंबईच्या शिवशक्ती संघानी अतिम फेरीत प्रवेश केला. पुरूष विभागात विजय क्लब मुंबई व बाबुराव चांदेरे फौंडेशन या संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सुवर्णयुग स्पोर्टस् संघाने कोल्हापूरच्या जयहनुमान संघ बाचणी संघावर दणदणीत विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतला सुवर्णयुग संघाकडे 12-11 अशी निसटती आघाडी होती. सुवर्णयुगच्या ईश्वरी कोंढाळकर व स्वाती खंदारे यांनी उत्कृष्ठ खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांना हर्षदा सोनवणे व सानिका तापकीर यांनी चांगल्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. जय हनुमान संघाच्या मृणाली टोणपे व प्रतिक्षा पिसे यांनी चांगला प्रतिकार केला. तर भारती पाटील हिने चांगल्या पकडी घेत चांगली लढत दिली.महिलांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या राजा शिवछत्रपती संघावर 33-21 असा विजय मिळवित अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांची गाठ सुवर्णयुग संघाशी पडेल. मद्यंतराला शिवशक्ती संघाकडे 16-10 अशी आघाडी होती. मुंबईच्या रेखा सावंत व ज्योती उफाळे यांनी आपल्या नावलौकीका प्रमाणे खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचे योगदान दिले. त्यांना सोनम भिलारे चांगल्या पकडी घेत विजयात आपला सहभाग नोंदविला. राजा शिवछत्रपती संघाच्या मानसी रोडे व सिध्दी मराठे यांनी चोफेर चढाया करीत चांगला प्रतिकार केला तर रिध्दी मराठे व नागिंद्रा कुरा यांनी उत्कृष्ठ पकडी घेतल्या. राजा शिवछत्रपती संघाच्या आल्फरा मेनन य़ा बलाढ्य शरीर यष्ठीच्या खेळाडूला खेळविले मात्र त्यांची ही चाल अयशस्वी ठरली.पुरूषांच्या पहिल्या उपांत्य फेरीत मुंबईच्या विजय क्लब संघाने पुण्याच्या सतेज संघ बाणेर संघावर 40-15 असा विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला विजय क्लब संघाकडे 19-7 अशी आघाडी होती. विजय क्लबच्या विजय कापरे याने चौफेर चढाया करीत सतेज संघाचे क्षेत्ररक्षण भेदत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याला विजय देवकर यांने चांगल्या पकडी घेत आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सतेज संघाच्या शुभम कुभांर व प्रदिप झिरपे यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र ते सर्वच आघाड्यावर अपयशी ठरल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.  शेवटच्या चढाई पर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामान्यात बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाने एनटीपीएस नंदुरबार संघावर 30-29 अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मद्यंतराला बाबुराव चांदेरे फौंडेशन हा संघ 10-11 असा पिछाडीवर होता. हा सामना निर्धारित वेळेत 24-24 अशा समान गुणांवर संपला. यानंतर हा सामना पाच पाच चढायामध्ये खेळविण्यात  आला. पाच पाच चढायांमध्ये शेवटच्या चढाईत सिध्दार्य़ देसाई याने एनटीपीएसचा खेळाडू टिपत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. निर्धारित विळेत बाबुराव चांदेरे फौंडेशनच्या सिध्दार्थ देसाई व अक्षय जाधव यांनी उत्कृष्ट खेल केला. तर विकास काळे याने महत्त्वाच्या पकडी घेतल्या. एनटीपीएसच्या शिवराज जाधव व दादा आवाड यांनी उत्कृष्ट चढाया करीत चांगली टक्कर दिली. त्यांना आदीनाथ गवळी याने चांगल्या पकडी घेतल्या मात्र विजयाने त्याच्याकडे पाठ फिरवली,

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबईPuneपुणे