शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत नाशिकमध्ये आजपासून रंगणार राज्य कबड्डीचा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:28 IST

नाशिक येथील सिन्नर येथे आजपासून "६६व्या वरिष्ठ गट पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी" कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

मुंबई : नाशिक येथील सिन्नर येथे आजपासून "६६व्या वरिष्ठ गट पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी" कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी, पुणे विरुद्ध बीड, जालना विरुद्ध हिंगोली, कोल्हापूर विरुद्ध पालघर या पुरुषांतील, तर नाशिक विरुद्ध परभणी, पालघर विरुद्ध लातूर या महिलांतील सामन्याने स्पर्धेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यनेते नाशिक जिल्हा कबड्डी, जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच-सिन्नर यांच्या सहकार्याने 4 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सिन्नर- नाशिक येथील आडवा फाटा मैदानावर हे सामने होणार आहेत. महाराष्ट्रातील 40 ते 45 खेळाडू सध्या प्रो-कबड्डीच्या स्पर्धेत खेळत असल्यामुळे या स्पर्धेत चुरस पहावयास मिळेल. पुण्याचे सिद्धार्थ देसाई, विकास काळे, विराज लांडगे, अक्षय जाधव आदी खेळाडू या वेळी पुण्यात नसणार, त्यामुळे पुण्याचा या स्पर्धेत कस लागणार आहे. नितीन मदने सांगलीकरिता उपलब्ध असल्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा सांगलीकर कसा उठवतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. 

या स्पर्धेसाठी मुंबईचे संघ पुरुष संघ :- १)सुदेश कुळे - संघनायक; २)जितेश सापते; ३)संकेत सावंत; ४)अजिंक्य कापरे; ५)विजय दिवेकर; ६)सुशांत साईल; ७)धीरज उतेकर; ८)ओमकार जाधव; ९)पंकज मोहिते; १०)ओमकार देशमुख; ११)सिद्धेश सावंत; १२)मयूर खामकर महिला संघ :- १)पौर्णिमा जेधे - संघनायिका; २)पूजा यादव; ३)साक्षी रहाटे; ४)ऋतुजा बांदिवडेकर; ५)प्रतीक्षा तांडेल; ६)प्रियंका कदम; ७)तेजश्री चौगुले; ८)श्रुती शेडगे; ९)मेघा कदम; १०) धनश्री पोटले; ११)श्रद्धा कदम; १२) तेजश्री सारंग.

टॅग्स :Kabaddiकबड्डी